Food viral video : पाणीपुरीवर अत्याचार! यूझर्स म्हणतायत, हे पाहून भूकच गेली

Weired food video : सोशल मीडियावर (Social media) 'मॅगी पाणीपुरी'ने (Maggi panipuri) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल (Viral) व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी डोक्याला हात लावला आहे.

Food viral video : पाणीपुरीवर अत्याचार! यूझर्स म्हणतायत, हे पाहून भूकच गेली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली मॅगी पाणीपुरी
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:30 PM

Weired food video : खाद्यपदार्थांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आवडीने पाहिले जातात. एखादा पदार्थ बनवताना त्यावर काहीतरी प्रयोग करायचा आणि नवा पदार्थ म्हणून सर्वांसमोर मांडायचा, हा जणू आता ट्रेंडच झालाय. मग या विचित्र डीश सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) ‘मॅगी पाणीपुरी’ने (Maggi panipuri) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल (Viral) व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी डोक्याला हात लावला आहे. कारण एक काळ असा होता जेव्हा लोक पाणीपुरीसाठी आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. पण एका पाणीपुरीवाल्या भैयाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे लोक पाणीपुरीत बटाट्याऐवजी मॅगी टाकून लोकांना खायला देत आहेत. हा व्हिडिओ केवळ 11 सेकंदांचा आहे, मात्र हा पाहिल्यानंतर यूझर्सचा संयम सुटत आहे. हे पाहून अनेक पाणीपुरीप्रेमींना धक्का बसला आहे.

ट्विटरवर शेअर

मॅगी पाणीपुरीचा हा व्हिडिओ ट्विटरवर @Iyervval या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की खूपच त्रासदायक व्हिडिओ. लोकांनी हा स्वतःच्या जबाबदारीवर पाहावा. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 74 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘हे इतकंही वाईट नाही’

एक यूझर म्हणतो, की हे इतकंही वाईट नाही. फँटा मॅगी, गुलाब जामुनचे पकोडे आणि गुलाब जामुन पराठे आजही अव्वल स्थानावर आहेत. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की हे पाहून माझी भूक मेली. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की अशा गोष्टी पाहिल्याने उलट्या होतात. याशिवाय काही यूझर्सनी अशा विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. एकंदरीत ही पाणीपुरीची फ्युजन रेसिपी पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा :

‘यह तो आशा की लहर है, यह तो उम्मीद की सेहर है’, गुरू रंधावानं शेअर केला चिमुकल्याचा हृदयस्पर्शी Video

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

Video : जिद्द आणि चिकाटी हवी तर ‘अशी’, 95व्या वर्षी ‘या’ आजी आहेत लाखोंच्या मालकीण; वाचा यशोगाथा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.