वय फक्त 24, पगार 58 लाख रुपये, सॉफ्टवेअर इंजिनिअर! तरीही आयुष्यात सुख नाही, असं का?
बेंगळुरूच्या एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पैसे आणि एकटेपणावर लिहिलेल्या एका हृदयस्पर्शी पोस्टने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई: पैशाने सुख विकत घेता येतं का? या प्रश्नावर लोकांची वेगवेगळी मते असल्याने या चर्चेत खरंतर काहीच हाती लागत नाही. बेंगळुरूच्या एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पैसे आणि एकटेपणावर लिहिलेल्या एका हृदयस्पर्शी पोस्टने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. तो सांगतो की तो वार्षिक 58 लाख रुपये कसे कमवतो आणि तरीही तो एकटा आहे आणि निराशाजनक जीवन जगत आहे.
जास्त पैसा कमावूनही हा माणूस एकटा
आपली गोष्ट शेअर करताना त्याने लिहिले की, “आयुष्य खूप कंटाळवाणं वाटत आहे. मी एफएएएनजी कंपनीत २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असून बंगळुरूमध्ये 2.9 वर्षांचा अनुभव आहे. मी चांगले पैसे कमावतो आणि काहीसा आरामात काम करतो. मात्र, मी माझ्या आयुष्यात नेहमीच एकटा असतो. वेळ घालवायला मला कोणतीही मैत्रीण नाही आणि माझे इतर सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत. माझं कामाचं आयुष्यही निरस आहे कारण मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून एकाच कंपनीत आहे आणि दररोज त्यात व्यस्त आहे आणि आता मी कामात नवीन आव्हाने आणि नव्या संधींची अपेक्षा करत नाही.
The other India.
Via @anonCorpChatInd pic.twitter.com/8G8t2kxBuU
— Sukhada (@appadappajappa) April 19, 2023
“माझं आयुष्य अधिक मनोरंजक करण्यासाठी मी काय करायला हवं याबद्दल कृपया मला सल्ला द्या,” असा प्रश्न या मुलाने पोस्ट लिहिताना विचारलाय. त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे आणि अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत दिलं आहे. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की, “माझ्या काही मित्रांनी हीच गोष्ट मला सांगितली आणि मलाही अनेकदा जाणवली. आणखी एका युजरने लिहिले की, “संघर्ष खरा आहे आणि पगाराची पर्वा न करता या सर्व गोष्टी आता गरजेच्या वाटतात. एकटेपणा हा आधुनिक जीवनाचा शाप आहे आणि आम्हाला तो मेनी नाही”, असंही एका युजरने लिहिले आहे.