Kshma Bindu : करुन दाखवलं! क्षमाने स्वतःशीच स्वतःचं लग्न लावलं, ते ही सांगितलेल्या तारखेच्या आधीच

Who is Kshma Bindu : Sologamy : फक्त दोनच गोष्टी या लग्नामध्ये नव्हत्या. एक म्हणजे नवरा मुलगा आणि दुसरं म्हणजे लग्न लावाणार भटजी.

Kshma Bindu : करुन दाखवलं! क्षमाने स्वतःशीच स्वतःचं लग्न लावलं, ते ही सांगितलेल्या तारखेच्या आधीच
अखेर लग्न लागलंच..Image Credit source: TOI
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 10:05 AM

स्वतःच स्वतःशी कुणी लग्न करतं का? असं यापुढे भारतात म्हणता येणार नाही. कारण असं एकीनं करुन दाखवलंय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियात क्षमाने अखेर करुन दाखवलं! क्षमाने स्वतःशीच स्वतःचं लग्न लावलं. ते ही सांगितलेल्या तारखेच्या आधीच! चर्चेत विषय ठरलेल्या 24 वर्षांच्या क्षमा बिंदूने (Kshama Bindu) स्वतःशीच लग्न केलं. तिने आधीच आपला निर्णय जगजाहीर केला होता. त्याच्या बातम्या झाल्यानंतर तर हा विषय खूपच चर्चेत आला. वादही रंगला. तिच्या निर्णयाची खिल्लीही उडवली गेली. पण क्षमाने करुन दाखवलं. बुधवारी तिने स्वतःशीच लग्न केलं. आपल्या मोजक्या दहा जवळच्या मैत्रिणींना तिनं लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. लग्नाचे सगळे विधी तिने रितसर पार पाडले. हळद लागली. मेहंदी काढली गेली. लाल रंगाच्या लग्नाच्या साडीत तिने खास फोटोसेशनही केलं. सात फेरेही घेतलं. विधीवत तिनं स्वतःच स्वतःशी लग्न (Self Marriage) केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुपचूप लग्नविधी सांगितलेल्या तारखेच्या तीन दिवस आधीच उरकलाय. 11 तारखेला स्वतःशीच ती लग्न बंधनात अडकणार होती. पण त्याआधीच म्हणजे 8 जूनलाच तिनं स्वतःशी स्वतःची लग्नाची गाठ बांधून घेतली आहे. असं तिनं का केलं, हेही तिनं स्पष्ट केलंय.

सोलोगमी चर्चेत…

स्वतःशीच लग्न करण्याच्या प्रकराला सोलोगमी म्हणतात. सोलोगमी हा शब्द गेले काही दिवस क्षमाच्या निमित्तानं ट्रेन्टमध्ये आहेत. क्षमाने स्वतःशीच केलेल्या लग्नामुळे आता सोलोगामीचा विषय चर्चेत आलाय. ‘सेल्फ लव’ यावरुन आता वादविवाद होऊ लागलेत. पण या वादाच्या पलिकडे जाऊन क्षमाने स्वतःला जे करायचं होतं, ते केलं. तिनं स्वतः स्वतःशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय सत्यात उतरवून दाखवलाय.

View this post on Instagram

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

देवळात जाऊन करायचं होतं, पण..

क्षमाला खरंत देवळात जाऊन लग्न करायचं होतं. पण तिनं स्वतःच्या लग्नाबद्दलचा निर्णय जगजाहीर करतात वाद उफाळून आला. पण तिला आपल्या लग्नाचा दिवस खराब करायचा नव्हता. जसं इतरांना लग्नाचा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा असं वाटतं, तसंच क्षमालाही ते वाटणं स्वाभाविकच होतं. पण वाद होईल, राडा होईल, या भीतीपोटी खबरदारी म्हणून तिनं घरच्या घरीच आपलं लग्न उरकलंय. शिवाय आपल्या लग्नसोहळ्याला गालबोट लागू नये, म्हणून तिनं आपला विवाह तीन दिवस प्रीपोंडही केला.

View this post on Instagram

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

फक्त दोनच गोष्टी या लग्नामध्ये नव्हत्या. एक म्हणजे नवरा मुलगा आणि दुसरं म्हणजे लग्न लावाणार भटजी. यांच्याशिवायच लग्नच्या विधी पार पाडत क्षमाने आपलं लग्न थाटामाटात आपल्या मैत्रिणींसोबत पार पाडलं.

View this post on Instagram

A post shared by Kshama Bindu (@kshamachy)

लग्नाच्या दिवसासाठी घेतलेली खास साडी, बांगड्यांचा चुडा, दागदागिने, मेहंदी, हळद, असा लग्नसोहळ्यातला सगळा आनंद तिनं आपल्या मैत्रिणींसोबत शेअर केलाय. लग्नासाठीचा खास मेकअपही तिनं करुन घेतला होता. लग्नानंतर ती आता हनिमूनलाही जाणार आहे. बहुतांश भारतीय कपल्सचं फेव्हरेट हनिमून डेस्टिनेशन असलेल्या गोव्यात ती आता जाणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.