Video | #Srivalli | हवाई सुंदरीला आवरला नाही मोह! श्रीवल्लीवर हुकस्टेप करणारी एअरहॉस्टेस पाहिली का?

डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल होतं. आता सिनेमा प्रदर्शित होऊन दीडहून अधिक काळ लोटला असली तरिही या सिनेमाची जादू अजूनही प्रेक्षकांवर जशीच्या तशी कायम आहे.

Video | #Srivalli | हवाई सुंदरीला आवरला नाही मोह! श्रीवल्लीवर हुकस्टेप करणारी एअरहॉस्टेस पाहिली का?
अल्लू अर्जुनची हुकस्टेप करताना एअर हॉस्टेस
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 8:06 AM

पुष्पा सिनेमातील (Pushpa The Rise) श्रीवल्ली गाण्याचे रोज नवनवे रील्स वायरल होत आहेत. प्रत्येकाला या सिनेमाच्या गाण्यांनी भुरळ पाडली आहे. अनेक व्हिडीओ पुष्पा सिनेमातील गाण्याचं दररोज पोस्ट होत असताना आता चक्क एका एअर हॉस्टेसनं विमानातच श्रीवल्लीचं रील केलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअरहॉस्टेसला श्रीवल्ली (Srivalli Song from Pushpa The Rise) हे रील करणं काही खास जमलेलं नसल्यानं अनेकांनी या एअर हॉस्टेसच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट केल्या असून पुष्पातील अल्लू अर्जूनची (Allu Arjun in Pushpa The Rise) डान्स स्टेप आपल्याला स्वःतालाही काही खास जमलेली नसल्याचं एअर हॉस्टेसनंही मान्य केलं आहे. आपल्या इन्स्ट्राग्रामवर एअर हॉस्टेसनं हा व्हिडीओ शेअर केला असून आपली डान्सस्टेप ही श्रीवल्लीची कमी आणि हात तुटलेल्या माणसाची जास्त वाटतेय, असं खुद्द एअरहॉस्टेसनंच म्हटलंय. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून अनेकांना एअर हॉस्टेसचा हा व्हिडीओ आवडलाय.

डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल होतं. आता सिनेमा प्रदर्शित होऊन दीडहून अधिक काळ लोटला असली तरिही या सिनेमाची जादू अजूनही प्रेक्षकांवर जशीच्या तशी कायम आहे. पुष्पा द राईज सिनेमाला लोकांनी जितकं डोक्यावर घेतलं, तितकंच या सिनेमाच्या गाण्यांनाही चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. आधी बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर पुष्पा द राईज सिनेमा हा ओटीटीवरही रीलिज झाला असून असूनही या सिनेमाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये.

पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Uma meenakshi (@yamtha.uma)

वायरल व्हिडीओमध्ये श्रीवल्लीची हुक स्टेप मारताना एअर हॉस्टेस दिसतेय. आपल्या सहकारी हॉस्टेसनं तिचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. विमानातच श्रीवल्लीचं रील करण्याचा मोह या हवाई सुंदरीला आवरला नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होतोय.

दरम्यान, नुकताच ब्रावो आणि डेविड वॉर्नर यांचंही पुष्पाप्रेम इन्स्टाग्राम रिल्समधून समोर आलं होतं. आता यात खलीचीही भर पडली आहे. खलीचाही पुष्पा दी राईज सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी या व्हिडीओवरही कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

VIDEO : विकेट घेतल्यानंतर ब्रावोच्या अंगात घुसला पुष्पा, श्रीवल्लीवर नाचत बॅट्समनला म्हणाला, मै नहीं झुकेगा’

Chicken Burgerचा हा Video पाहून यूझर्स म्हणतायत, ओ मेरे बर्गर जो तुम खाओगे, बड़ा पछताओगे!

बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्
आठवीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी अन्.
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल
'...यांच्या विजयाचा बाप लावारिस', बोगस मतदानावर 'सामना'तून हल्लाबोल.
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्...
जरांगेंची तब्येत खालावली, तरी उपोषणावर ठाम; सरकारकडे या मागण्या अन्....
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?
भाजप दादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना फोडणार? राऊतांचा दावा काय?.
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम
आकाला 'स्पेशल 26' पोलिसांचं प्रोटेक्शन? बीड पोलीस दलात कराडची टीम.
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.