Video : व्वाsss! काय पोलीस अधिकारी, पोलिसानं केलं असं काही…. मादी माकडही झाली खूश
व्हिडीओला चांगलाच पाहिला गेलाय. नेटिझन्सने देखील या व्हिडीओला चांगलंच डोक्यावर घेतलंय.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही घडत असतं. प्रत्येक तासाला कोणतातरी व्हिडीओ येतो आणि तुफान धुमाकूळ घालून जातो. यानंतर त्याला नेटिझन्सचा कल देखील महत्त्वाचा असतो. लोकांना चांगलं वाटलं तर लोक त्या व्हिडीओला (viral video) लाईक करतात. नाहीतर तो व्हिडीओ बघत देखील नाहीत. ट्विटरवर उत्तर प्रदेशमधील एका पोलिसाचा (police constable) एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओला चांगलाच पाहिला गेलाय. नेटिझन्सने देखील या व्हिडीओला चांगलंच डोक्यावर घेतलंय. व्हिडीओमधील पोलिसाचं मोठं कौतुक केलं जातंय. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलीस खूप प्रेमानं मादी माकड आणि तिच्या पिल्लाना आंबा कापून घालू घालतोय. तर मादी माकड देखील या क्षणाचा आनंद घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा पुढील व्हिडीओ
UP 112, सबके ‘Mon-key’ समझे..
हे सुद्धा वाचाWell Done Constable Mohit, PRV1388 Shahjahapur for making good deeds an ‘Aam Baat’ #PyarKaMeethaPhal#UPPCares pic.twitter.com/z2UM8CjhVB
— UP POLICE (@Uppolice) June 12, 2022
व्हिडीओमध्ये काय आहे?
ट्विटरवर व्हायरल या व्हिडीओमध्ये आपन पाहू शकतो की, पेट्रोलिंग गाडीचा दरवाजा उघडून पोलीस आंबा कापताना दिसतो आहे. यावेळी त्या व्हिडीओमधील मादी माकड देखील त्याच्या हातातील आब्याकडे पाहते. ज्यावेळी पोलीस आंबा कापतो आणि त्या मादी माकडाकडे हात देऊन खाण्यासाठी देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ती मादी माकड देखील मोठ्या धैर्यानं ती आंबा खाण्याचा प्रयत्न करते. विशेष म्हणजे तीचं छोटसं पिल्लू त्या मादी माकडाच्या खांद्यावर बसलेलं असतं. हा क्षण खूप काही सांगून जातोय. विशेष म्हणजे आपल्या कामातून वेळ काढून वेळ मिळेल तिथे प्राण्यांसाठी काहीतरी करण्याचं या पोलिसाचं काम खूप काही सांगून जातंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. याला नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळाली आहे.
मादी माकड आणि पोलिसाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकलंय. या व्हिडीओ सोबत कॅप्शनमध्ये कौतुक करण्यात आलयं. 12 जूनला रात्री अपलोड करण्यात आला आहे.
या व्हिडीओला साठ हजार वेळा पाहिलं गेलंय. आता याचा आकडा त्याहीपेक्षा वर गेला असेल. त्याच पोस्टला नेटिझन्सकडून चांगलंच पसंत करण्यात आलं असून तीन हजार पेक्षा अधिक लोकांना लाईक केलं आहे. ही संख्या सलग वाढत चालली आहे. या व्हिडीओवर चांगल्या रंजक प्रतिक्रिया देखील येत आहेत.