यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!

Girgaon Gram Panchayat result viral photo : ग्रामपंचायत निकालानंतर जल्लोषाचा एक फोटो महाराष्ट्रात व्हायरल होत आहे.

यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!
Girgaon Gram Panchayat
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 1:00 PM

कोल्हापूर : ग्रामपंचायत निकालाच्या (Gram Panchayat result update) धामधुमीनंतर कुठे विजयाचा जल्लोष तर कुठे पराभवाने हिरमुसलेलं वातावरण पाहायला मिळालं. गावकी आणि भावकीत तेढ निर्माण करणारी निवडणूक म्हणून ग्रामपंचायत इलेक्शन तसं ‘बदनाम’ आहे. राज्यातील जवळपास 14 हजार ग्रामपंचायतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. गावागावात स्थानिक पॅनेलच्या माध्यमातून (Girgaon Gram Panchayat result viral photo) ही निवडणूक लढली जाते. मात्र हेच पॅनेल कोणत्या आमदार-खासदाराचे किंवा पक्षाचे समर्थक आहेत, त्यावरुन राजकीय पक्षांनी आपआपले दावे केले आहेत. (Story behind viral photo of Gram Panchayat election result Girgaon Kolhapur)

राज्यातील ग्रामपंचायत निकालावरुन भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं चित्र आहे. भाजपने 13,833 ग्रामपंचायतींपैकी 3,263 पंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादी 2,999 ग्रामपंचायतींसह दुसऱ्या, शिवसेना 2,808 सह तिसऱ्या आणि काँग्रेस 2,151 ग्रामपंचायतींसह चौथ्या क्रमांकावर आहे.

गावागावात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. कुठे सासू विरुद्ध सून, कुठे जाऊ विरुद्ध जाऊ, कुठे भाऊ-भाऊ अशा लढती झाल्या. निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होत होते, तसतसा जल्लोष पाहायला मिळत होता. विजयानंतर गुलाल उधळून आनंद साजरा होत होता. याच जल्लोषाचा एक फोटो महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. या फोटोत आपल्या पत्नींना उचलून घेऊन, जल्लोष करणारे पती दिसत आहेत. तीन महिला उमेदवारांनी आपआपल्या वॉर्डात विजय मिळवल्यानंतर त्यांच्या पतीदेवांनी त्यांना उचलून घेऊन आनंद साजरा केला.

फोटो नेमका कुठला?

हा फोटो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव (Girgaon Gram Panchayat result) या गावचा. करवीर तालुक्यातील गिरगाव ही 11 सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. या गावातील 1 जागा आधीच बिनविरोध झाली होती. उरलेल्या 10 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवलं. गिरगावातील सतेज पाटील गट आणि ग्रामविकास आघाडी एकत्र येऊन ही निवडणूक लढली. या आघाडीने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवत, सर्व दहाच्या दहा जागांवर विजय मिळवला.

Girgaon Gram Panchayat

Girgaon Gram Panchayat

पत्नीला उचलून घेणाऱ्या पतीदेवांची कहाणी

कोल्हापुरातील रमणमळा परिसरात मतमोजणी झाली. यावेळी सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. गिरगावातील सतेज पाटील गट आणि ग्रामविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचे कळताच एकच जल्लोष झाला. गिरगावातील अ वॉर्डमध्ये उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित दोन जागांवर झालेल्या निवडणुकीत शुभांगी संजीव कोंडेकर आणि शीतल प्रविण चव्हाण यांचा विजय झाला. याशिवाय ब वॉर्डमध्ये उत्तम विष्णू पाटील, अर्चना सावंत आणि अर्चना गुरव यांनी बाजी मारली. क वॉर्डमध्ये जालंदर पाटील आणि वैशाली परीट यांचा विजय झाला. तर ड वॉर्डमध्ये गीता महेश पाटील, संतोष सुतार आणि महादेव कांबळे यांनी गुलाल उधळला.

या विजयानंतर शुभांगी कोंडेकर यांचे पती संजीव कोंडेकर, शीतल यांचे पती प्रविण चव्हाण आणि अर्चना गुरव यांचे पती रामचंद्र यांनी आपल्या पत्नींना उचलून घेऊन व्हिक्टरी साईन अर्थात विजयाचं चिन्हं दाखवून जल्लोष केला. पत्नीच्या विजयांचा जल्लोष करणाऱ्या पतीदेवांचा हा व्हिडीओ उपस्थितांनी शूट केला आणि बघता बघता तो राज्यभरात व्हायरल झाला.

याच जल्लोषाचे फोटो अनेकांचे डीपी आणि व्हॉट्सअॅप स्टेटसला दिसले. इतकंच नाही तर अनेक स्थानिक वृत्तपत्रातांच्या हेडलाईन्समध्ये हाच फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

पत्नीच्या विजयासाठी सर्व कुटुंबीय राबत होतं. दिवस उजाडल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत प्रचार आणि प्रचारच सुरु होता. कुटुंबाचा भार सांभाळणाऱ्या पत्नीला याच पतीदेवांची भक्कम साथ मिळाली. कष्टाला विश्वासाची जोड मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून मस्तकी विजयाचा टिळा लागला. हाच जल्लोष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला.

पाहा व्हिडीओ 

(Story behind viral photo of Gram Panchayat election result Girgaon Kolhapur)

संबंधित बातम्या  

Gram Panchayat Election 2021 Result | माझा कारभारी लय भारी!

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.