Video | शाळेत क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा तोल गेला, मग सरळ जाऊन विकेटवर…
Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यावेळी एका मुलाचा तोल गेलाय, त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.
मुंबई : क्रिकेटला (cricket trending story) दुनियातले लोकं पाहतात आणि दुनियात क्रिकेट खेळलं जात. नुकतचं आयपीएल (ipl 2023) संपलं. भारतात विविध ठिकाणी मॅच झाल्या, त्याची अजून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. चैन्नईच्या टीमने पाचव्यांदा किताब पटकावला. भारतात क्रिकेटचं इतकं वेड आहे. जिथं वेळ मिळेल तिथं लोकं क्रिकेट खेळायला सुरुवात करतात. काही लोकं मैदानात क्रिकेट खेळतात. तर काही लोकं गल्लीत क्रिकेट खेळतात. सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Cricket Viral Video) झाला आहे. त्यामध्ये काही मुलं शाळेत क्रिकेट खेळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी एक मुलगा बॉलिंग करीत आहे. त्यावेळी बॉलिंग टाकल्यानंतर त्याचा तोल जातो. मग काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.
व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला
सध्या जो व्हि़डीओ व्हायरला झाला आहे, त्यामध्ये काही मुलं शाळेत क्रिकेट खेळत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यावेळी बॉलिंग करीत असलेला विद्यार्थी बॉल टाकल्यानंतर तोल गेल्यामुळे जोरात आपटतो. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरता येत नाहीये, विशेष कारण असं आहे की, या व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष खेचलं आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
त्याचा तोल गेल्यामुळं…
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला ट्विटरवरती @NoContextHumans नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यातं आलं आहे. त्यामध्ये एक मुलगा दरवाज्याच्या बाहेर पळत येऊन बॉलिंग करीत आहे. बॉलिंग केल्यानंतर त्याला स्वत:ला आवरता आलेलं नाही. त्याचा तोल गेल्यामुळं तो पळत जाऊन समोर असलेल्या स्टूलाला धडकतो. हे सगळं पाहिल्यानंतर काही युजर्स दंग झाले आहेत.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) May 31, 2023
व्हिडीओला 13 लाख व्यूज मिळाले
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. बातमी लिहीपर्यंत सोशल मीडिया 13 लाख पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ६ हजार पेक्षा अधिक लोकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. व्हिडीओला पाहून नेटकरी चांगल्या वाईट प्रतिक्रिया देत आहेत.