viral video | शेतकऱ्याने ऑडीतून येऊन भाजी विकली, पब्लीक झाले हैराण

शेतीत फायदा होत नाही म्हणून रडत न बसता या शेतकऱ्याने मोठी प्रगती केली आहे. तो आपल्या आलिशान ऑडी कारमधून रोज शेतातील भाजी बाजारात विकायला जात असतो. त्याला पाहून लोक आश्चर्यचकीत होत आहेत.

viral video | शेतकऱ्याने ऑडीतून येऊन भाजी विकली, पब्लीक झाले हैराण
sujit Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 6:56 PM

केरळ | 29 सप्टेंबर 2023 : शेतकऱ्यांना फार तर आपण मोटरसायकल, टेम्पो, ट्रॅक्टर किंवा जीपमधून जाताना पाहात असतो. परंतू आता जमाना बदलून गेला आहे. आता जमाना असा आला आहे की शेतकरी लक्झरी कारमध्ये बसून बाजारात आपले उत्पादन विकायला जात आहे. तुम्हा खरे वाटत नसेल तर केरळच्या एक शेतकऱ्याची कहानी तुम्ही वाचायला हवीच. या शेतकऱ्याने मेहनतीच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. केरळचा हा शेतकरी साध्यासुध्या नव्हे तर चक्क ऑडी ए 4 मध्ये बसून बाजारात भाजी विकायला जात आहे.

शेतीचा व्यवसाय तसा बिनभरोशाचा म्हटला जातो. शेती करणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. लहरी हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर कधी भाव न मिळाल्याने उत्पादन कचऱ्यात फेकून द्यावे लागते. तरी काही शेतकऱ्यांनी मेहनतीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य पद्धतीने शेती करून कमाई देखील होत आहे. त्यामुळे शिक्षित युवक मोठ्या संख्येने पुन्हा पारंपारिक शेती व्यवसायात लक्ष घालत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

आधुनिक तंत्राने केली करामत

टाईम्समध्ये आलेल्या बातमीनूसार केरळच्या या ऑडीवाल्या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. तो देखील आधुनिक शेतकऱ्यांच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. आणि आज तो यशस्वी शेतकरी बनला असून अनेक शेतकऱ्यांचा आदर्श बनला आहे. लोक त्याला रस्त्याच्याकडेला ऑडी कार उभी करून भाजी विकताना पहातात तर आश्चर्यचकीत होऊन जातात. एका शेतकऱ्यांच्या या प्रगतीने सारे स्तंभीत झाले आहेत.

सोशल मिडीयावर प्रसिद्ध

सुजीत त्याच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर त्याचे अकाऊंट आहे. तो शेतीची माहीती शेअर करीत असतो. त्याच्याकडून अनेक जण प्रेरणा घेऊन जैविक शेती शिकत आहेत. इस्टाग्रामवर सुजीत शेअर केलेल्या व्हिडीओत ऑडी कारमधून उतरतो. बाजारात पथारी पसरत त्यावर पालेभाज्या विकताना दिसत आहे. या व्हिडीओत त्याच्या भाजीच्या जुड्या पटापट विकल्या जाताना दिसत आहे. नंतर तो आपल्या ऑडीमधून घरी जाताना दिसत आहे. सुजीत ही ऑडी कार सेंकड हॅण्ड विकत घेतली होती. ऑडी ए 4 केवळ 7.1 सेंकदात 100 किमीचा वेग पकडते. नवीन ऑडी ए 4 ची किंमत 44 ते 52 लाखापर्यंत आहे. एका शेतकऱ्याने ती खरेदी करणे आणि तिच्या देखभालीचा धाडसी निर्णय घेतल्याने त्याचे कौतूक होत आहे.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.