गजब जुगाड, वर्षभर ट्रेनमध्ये मोफत प्रवास, रेल्वेला समजल्यावर काहीच करता आले नाही कारण होती ही ट्रिक
ब्रिटनमधील ट्रेनला उशीर झाल्यास परताव्याचे नियम आहेत. त्या नियमानुसार जर ट्रेन 15 मिनिटे उशीर झाली तर 25% परतावा परत दिला जातो. ट्रेनला 30 मिनिटांनी उशीर झाला तर 50% परतावा मिळतो. ट्रेनला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला तर पूर्ण पैसे परत केले जातात.

रेल्वेने प्रवास आजही अनेकांची पसंती आहे. स्वस्त अन् सुरक्षित प्रवास असल्यामुळे रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. रेल्वे प्रवासात टीटीईला अनेक फुकटे प्रवाशी मिळतात. ते तिकीट न काढता रेल्वे प्रवास करतात. परंतु जेव्हा पकडले जातात तेव्हा त्यांना चांगला आर्थिक भुर्दंड भरावे लागते. परंतु एका व्यक्तीने वर्षभर प्रवास केला. वर्षभरात त्याने तिकिटाचे 1 लाख 6 हजार रुपये वाचवले. कोणतेही शुल्क न भरता त्यांचा हा प्रवास सुरु राहिला. यासंदर्भात रेल्वेला समजल्यावरही काहीच करता आले नाही. रेल्वेला कोणत्या पद्धतीने या व्यक्तीने चुना लावला? हा विचार तुम्ही करत असला. ब्रिटनमधील एड वाइज नावाच्या व्यक्तीने एका नियमाचा फायदा उचलला. त्यामुळे तो बिनधास्तपणे वर्षभर कोणतेही पैसे न भरता प्रवास करु लागला.
असा वापरला फंडा
29 वर्षीय एड वाईज हे व्यवसायाने लेखक आहेत. ते अर्थ विषयावर लिखाण करतात. त्यांनी ट्रेनच्या वेळा आणि ट्रेनला होणाऱ्या उशिराच्या पद्धतींचा बारकाईने अभ्यास केला. ज्यामुळे ट्रेन कधी उशीर होईल आणि त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा कधी मिळेल? त्याचा सर्व अभ्यास झाला. त्यानंतर प्रत्येक वेळी तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळावेत म्हणून त्यांनी पूर्ण नियोजन करून तिकिटांचे बुकींग केले. या पद्धतीचा वापर करून त्यांना 2023 मध्ये केलेल्या सर्व प्रवाशाचे पैसे परत मिळावले. त्यांच्या या नियोजनामुळे त्यांना केवळ तीन वर्षांत ₹1.06 लाखांपेक्षा जास्त पैसे परत मिळाले.
या नियमामुळे मिळाले पैसे परत
ब्रिटनमधील ट्रेनला उशीर झाल्यास परताव्याचे नियम आहेत. त्या नियमानुसार जर ट्रेन 15 मिनिटे उशीर झाली तर 25% परतावा परत दिला जातो. ट्रेनला 30 मिनिटांनी उशीर झाला तर 50% परतावा मिळतो. ट्रेनला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला तर पूर्ण पैसे परत केले जातात. एड वाईज यांनी या नियमाचा पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी संप, देखभाल आणि खराब हवामानामुळे ट्रेन उशिराने येत असल्याचे पाहिले. त्याच आधारे त्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन केले. जेव्हा ट्रेन उशिरा येण्याची शक्यता असेल त्या ट्रेनचे ते तिकीट बुक केले. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त परतावा परत मिळाले.




एड वाईज म्हणाले, रेल्वेची व्यवस्था पूर्णपणे समजून घेऊन योग्य नियोजन केले. त्यामुळे प्रत्येक वेळी पूर्ण पैसे परत मिळाले. त्यांच्या या ट्रिकमुळे वर्षभर मोफत प्रवास करता आला. रेल्वे नियमाचा कायदेशीर फायदा घेऊन प्रवास खर्चात मोठी बचत करता येते, हे वाईज यांनी दाखवून दिली. थोडी समजूत दाखवली आणि योग्य नियोजन केले तर खिशावरचा भार कमी करता येतो, हे त्याच्या या स्मार्ट ट्रिकने दाखवून दिले.