महागात पडलं ‘होम टॅटू हॅक’, चेहऱ्यावर डागही पडले अन् तात्पुरतं अंधत्वही आलं; वाचा, बिग ब्रदर स्टार काय म्हणतेय?
Tatoo side effects : एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या (Social media influencer) चेहऱ्यावर डाग पडले, तर ती एका डोळ्याने तात्पुरती आंधळी झाली आहे. हे सर्व घडले ते टॅटूमुळे (Tatoo)... टिली व्हिटफेल्ड (Tilly Whitfeld) असे या महिलेचे नाव आहे.
Tatoo side effects : एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरच्या (Social media influencer) चेहऱ्यावर डाग पडले, तर ती एका डोळ्याने तात्पुरती आंधळी झाली आहे. हे सर्व घडले ते टॅटूमुळे (Tatoo)… चेहऱ्यावर टॅटू काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या इन्फ्लूएन्सरच्या चेहऱ्यावर डाग पडले. ज्यावर ती आता उपचार घेत आहे. टिली व्हिटफेल्ड (Tilly Whitfeld) असे या महिलेचे नाव आहे. तिचे वय 22 वर्षे आहे. ती नॉर्दर्न बीच, सिडनीची आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, टॅटू बनवल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याचवेळी तिच्या चेहऱ्याजवळ आणि नाकावर डाग पडले होते. तिने सेविंग निडल आणि शाई वापरली. तिने ते ऑनलाइन खरेदी केले. ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑस्ट्रेलियातील ‘बिग ब्रदर’च्या सीझनमध्ये सहभागी आहे. ऑस्ट्रेलियातील ‘बिग ब्रदर’मध्ये सहभागी झालेल्या टिलीने टिकटॉक व्हिडिओ बनवून संपूर्ण घटना शेअर केली आहे.
‘होम टॅटू हॅक’ अंगलट
टिली घरी ‘होम टॅटू हॅक’ वापरत होती. त्यासाठी तिने ऑनलाइन टॅटू इंक आणि सेव्हिंग निडल मागवली होती. तिने मागवलेली शाई बनावट होती आणि त्यात शिशाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अर्धवट खुणा राहिल्या आणि संसर्गही झाला. आता व्हिडिओ पाहून तिचे फॉलोअर्स हैराण झाले, तिच्या ओठांवर शाई होती. त्याचबरोबर तिने तिच्या उपचाराशी संबंधित एक व्हिडिओही शेअर केला आहे.
View this post on Instagram
बिग ब्रदरमध्ये घातला होता ब्लू क्ले फेस मास्क
टिली बिग ब्रदरमध्ये दिसली, तेव्हा तिने ब्लू क्ले फेस मास्क घातला होता. तिने ही गोष्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केली आहे. तिने लिहिले आहे, बिग ब्रदर मालिकेदरम्यान मी निळ्या रंगाचा क्ले फेस मास्क का घातला, हे मला सतत विचारत जात होते. याचे कारण म्हणजे बिग ब्रदर सुरू होण्याच्या 2 महिने आधी मी टिकटॉकवर ‘होम ब्युटी प्रोसिजर’चा व्हिडिओ पाहिला होता. ज्याचा मी प्रयत्न केला आणि त्यानंतर रुग्णालयात पोहोचले आणि माझ्या पाहण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे.
‘वर्षाअखेर चेहरा ठीक होईल’
टिली एका टिकटॉक व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर लाल डागांसह दिसली. ज्यामध्ये तिने आपल्या फॉलोअर्सना असे काहीह करू नका, असे सांगितले होते. चेहऱ्यावर टॅटू काढण्याचा विचारही करू नका. त्याचवेळी टिलीने हेदेखील उघड केले, की तिला या डागांपासून मुक्त होण्यासाठी एन्झाइम पील्स, microdermabrasion हे सर्व करावे लागत आहे. ‘ही जरा लांबची प्रक्रिया आहे. पण असे केल्याने माझा चेहरा ठीक होईल, अशी आशा आहे. मी उत्साहित आहे आणि मला खूप आशा आहे, की वर्षाच्या अखेरपर्यंत माझा चेहरा ठीक होईल.