Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!
तेलंगणातील डुमापलापेट गावातील दोन मुलांमध्ये मैत्रीचे संबंध होते. यातल्या एकाचं वय 21 वर्षे आणि दुसऱ्याचं वय 22 वर्षे आहे. त्यांनी दारूच्या नशेत लग्न केलं आणि लगोलग घटस्फोटही घेतला.
मुंबई : दारूच्या नशेत (Intoxication) आपण काय करतो, याचं भान अनेकांना राहत नाही. असंच काहीसं घडलंय तेलंगणामध्ये (Telangana). तेलंगणातील डुमापलापेट गावातील दोन मुलांमध्ये मैत्रीचे संबंध होते. यातल्या एकाचं वय 21 वर्षे आणि दुसऱ्याचं वय 22 वर्षे आहे. त्यांनी दारूच्या नशेत लग्न केलं आणि लगोलग घटस्फोटही घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन तरूण डुमापलापेट (Dumaplapet) गावात एका ताडीच्या दुकानात भेटले आणि तिथे त्यांची मैत्री झाली. यानंतर ते दारू पिण्यासाठी वरचेवर भेटू लागले. 1 एप्रिल या दिवशी मेडक जिल्ह्यातील चांदूर इथे राहणाऱ्या 22 वर्षीय ऑटोचालकाने संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट गावच्या या 21 वर्षीय तरूणाशी लग्न केलं. जोगीनाथ गुट्टा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. काहीच दिवसात त्यांनी घटस्फोटही घेतला.
दारूच्या नशेत लग्नगाठ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन तरूण डुमापलापेट गावात एका ताडीच्या दुकानात भेटले आणि तिथे त्यांची मैत्री झाली. यानंतर ते दारू पिण्यासाठी वरचेवर भेटू लागले. 1 एप्रिल या दिवशी मेडक जिल्ह्यातील चांदूर इथे राहणाऱ्या 22 वर्षीय ऑटोचालकाने संगारेड्डी जिल्ह्यातील या 21 वर्षीय तरूणाशी लग्न केलं. जोगीनाथ गुट्टा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते.
काही दिवसांनी संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट गावच्या या 21 वर्षीय तरुणाने ऑटोचालकाच्या घरी जाऊन आपल्या लग्नाबाबत माहिती दिली. त्याने या ऑटोचालकाच्या पालकांना सांगितलं की त्याला त्यांच्या मुलाकडे राहण्याची परवानगी देण्यात यावी. त्याने सांगितलं की,” माझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आपण मला या घरात राहण्यास परवानगी द्या”. पण त्याचा काही फायदा झाला नाही. कारण या तरूणाला ऑटोचालकाच्या घरात राहण्यास परवानगी मिळाली नाही. आता यातल्या या 21 वर्षीय तरूणाचं म्हणणं होतं की माझं हे हक्काचं घर आहे. इथे मला राहू द्यावं. पण तसं न झाल्याने त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. या ऑटोचालकापासून दूर जाण्यासाठी आपल्याला एक लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही केली.
“या प्रकरणामध्ये दोन्हीकडच्या मंडळींच्या मनात भीतीचं वातावरण होतं. त्यांनी आपासात चर्चा करून प्रश्न सोडवला. वाटाघाटीनंतर जोगीपेठ येथील व्यक्तीने ऑटोचालकाच्या कुटुंबाकडून या बेघर तरूणालाा 10 हजार रुपये रक्कम देण्यात आली. यानंतर संमतीने दोघे वेगळे झाले आहेत”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संबंधित बातम्या