16,210 एकर जमिन, बोईंग-एअरबसपासून सुखोईपर्यंत 38 विमाने दिमतीला, पदरी 300 कार ताफा, कुबेराचा धनी आहे हा राजा
जगात अनेक ठिकाणे राजेशाही असली तरी तेथील राजाच्या संपत्तीपेक्षाही या राजाची संपत्ती कित्येकपटींनी जास्त आहे.
नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : अनेक देशात अजूनही राजेशाही टीकून आहे. राजघराण्याचा विषय निघाला तर ब्रिटनचे राजघराणे, ब्रुनोईचा सुल्तान, सौदीचे शाही घराण्यासह अनेक राजघराण्याचा विलासी संपत्तीची चर्चा होते. परंतू जगात एक राजा इतका श्रीमंत आहे की त्याच्या संपत्तीचा काही अंदाजच तुम्ही लावू शकत नाही. त्याच्याकडे 3.2 लाख कोटीची संपत्ती आहे. हा राजा अतिशय लक्झरी आणि रॉयल आयुष्य जगत असतो. या राजाकडे 38 विमाने, शेकडो महागड्या कार त्याच्या जवळ आहेत.
जगात अनेक ठिकाणे राजेशाही असली तरी तेथील राजाच्या संपत्तीपेक्षाही या राजाची संपत्ती कित्येकपटींनी जास्त आहे. थायलंडचा राजा किंग रामा X याची तुम्हाला माहीती देत आहोत. या राजाचे खरे नाव किंग महा वजिरालोंगकोर्न आहे. फायनान्सियल टाईम्सच्या वृत्तानूसार थायलंडच्या शाही परिवाराची संपत्ती चाळीस अब्ज डॉलर म्हणजे 3.2 लाख कोटीहून अधिक आहे. त्यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत राजात केली जाते.
16,210 एकर जमीन
थायलंडच्या राजा किंग महा वजीरालॉन्गकोर्नची संपत्ती देशभरात पसरली आहे. या राजाकडे थायलंडमध्ये 6,560 हेक्टर ( 16,210 एकर ) जमिन आहे. ज्यात 40,000 भाडे करारांचा समावेश आहे. ज्यात राजधानी बॅंकॉक येथील 17,000 कॉंन्ट्रॅक्टचा समावेश आहे. या जमिनीवर मॉल, हॉटेलसह अनेक सरकारी जमीनीचा समावेश आहे.
किंग महा वजिरालोंगकोर्नची थायलंडच्या दुसरी मोठी बॅंक सियाम कमर्शियल बॅंकेत 23 टक्के भागीदारी आहे. देशातील सर्वात मोठ्या सियाम सिमेंट समूहात त्यांची 33.3 टक्के भागीदारी आहे.
38 विमानाचा जामानिमा
थायलंडच्या राजाचे विलासी जीवनही आणि त्यांचे शौक देखील महागडे आहेत. थायलंडच्या या राजाकडे 21 हेलिकॉप्टरसह 38 एअरक्राफ्ट आहेत. यात बाईंग, एअरबस विमाने, सुखोई फायटर जेट देखील आहेत. या सर्व एअरक्राफ्टच्या इंधन आणि मेन्टेनन्सवरच वार्षिक 524 कोटी रुपये खर्च होतात.
शाही मुकूटावर 98 कोटींचा हीरा
थायलंडच्या राजाच्या मुकूटातील हीरा 545.67 कॅरेटचा गोल्डन ज्युबली हीरा आहे. हा जगातील महागडा हिरा म्हटले जात असून द डायमंड अथोरिटीने याची किंमत 98 कोटी असल्याचे म्हटले आहे.
23,51,000 चौरस फूटाचा महाल
थायलंडच्या राजा ग्रॅंड पॅलेस महालात राहतो. हा महालच 23,51,000 चौरस फूट आहे. तो 1782 मध्ये बांधून तयार झाला होता. किंग रामा X शाही महलमध्ये राहत नाहीत. या महालात सरकारी कार्यालये आणि ऑफीस तसेच म्युझियम आहेत.
300 महागड्या कार
राजाच्याकडे लिमोझिन, मर्सिडीज बेंझसह 300 हून अधिक महागड्या कार आहेत. रॉयल बोट ही राजघराण्याची सर्वात पुरातन ठेवा आहे. या शाही नौके सोबत 52 नावांचा ताफा चालतो. या सर्व नोटांवर सोन्याची नक्षी केली आहे. त्यांना सुफानाहॉन्ग म्हटले जाते.