Video : गावचं साधेपण जपणारी माणसं! नवरीची थेट बैलगाडीतून एन्ट्री, वऱ्हाडी बघतच राहिले…

ठाणे जिल्ह्यातल्या दिवा गावात एका लग्नात नवरीनं चक्क 'छकड्यात' म्हणजे शर्यतीच्या बैलगाड्यात बसून एन्ट्री केली. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Video : गावचं साधेपण जपणारी माणसं! नवरीची थेट बैलगाडीतून एन्ट्री, वऱ्हाडी बघतच राहिले...
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 1:28 PM

ठाणे : सध्या लग्नात दिमाखात आणि ग्रॅण्ड एन्ट्री करण्याची पद्धत रूढ झाली आहे. आपलं लग्न आणि त्यातली नवरा-नवरीची एन्ट्री (Bride Entry Video) लक्षात राहावी यासाठी लाखोंचा खर्च केला जातोय. पण काही लोक आजही आपला साधेपण जपून आहेत. त्यासाठी ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीतून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नवरीने चक्क बैलगाडीतून लग्नमंडपात एन्ट्री केली आहे. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नवरीने चक्क बैलगाडीतून लग्नमंडपात एन्ट्री केली आहे.ठाणे जिल्ह्यातल्या दिवा गावात एका लग्नात नवरीनं चक्क ‘छकड्यात’ म्हणजे शर्यतीच्या बैलगाड्यात बसून एन्ट्री केली. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्ह्यातील दिव्यामधल्या दातिवली गावात सुनील पाटील यांच्या कन्येचा विवाहसोहळा शनिवारी पार पडला. या विवाह सोहळ्यात नवरी हेमांगीनं चक्क ‘छकड्यात’ म्हणजेच बैलगाडा शर्यतीतल्या बैलगाड्यात बसून लग्नात एन्ट्री केली. यावेळी वऱ्हाडी मंडळींनी तिचं जोरदार स्वागत केलं. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होऊ लागल्या आहेत. त्यामुळं या खेळाची आधीपासून असलेली लोकप्रियता आता आणखी वाढली आहे. त्यात ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना पोटच्या मुलापेक्षा जास्त जपलं जातं. त्यामुळं दातिवली गावातली नवरीची ही एन्ट्री सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरलीये.

सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लग्नातले विविध व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यातले काही व्हीडिओ जरा हटके असतात. अशीच हटके एन्ट्री या नवरीने केली तिची ही अस्सल गावरान एन्ट्री अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.