…अन् काही फूट फरफटत गेली रिक्षा, पाण्यानं भरलेले फुगे फेकल्यानं घडली दुर्घटना, पाहा Video
एक घटना उत्तर प्रदेशात (Uttar pradesh) घडली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत येथे शनिवारी होळी उत्सव साजरा करताना फेकलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे (Balloon) एक रिक्षा पलटी झाली, ज्यामुळे अपघात घडला आहे.
लखनऊ : होळीचा (Holi) सण नुकताच साजरा झाला. होळी आणि त्यानंतर धूळवड देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र यावेळी काही समाजकंटकांकडून चुकीच्या गोष्टीही करण्यात आल्या, ज्यामुळे या सणाला गालबोट लागले. देशभरात एकीकडे उत्साहात सण साजरे होत असताना काही ठिकाणी मात्र गैरकृत्यांमुळे अनेकजण जखमी तर काही गंभीर जखमीही झाल्याचे पाहायला मिळाले. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात (Uttar pradesh) घडली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत येथे शनिवारी होळी उत्सव साजरा करताना फेकलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे (Balloon) एक रिक्षा पलटी झाली, ज्यामुळे अपघात घडला आहे. ही सर्व घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे, ज्यात प्रवाशांनी भरलेली ऑटो रस्त्यावरून अक्षरश: फरफटत पुढे गेल्याचे दिसत आहे. ज्यांनी फुगे आणि पाणी फेकले ते मात्र मौजमजा करत असल्याचे दिसत आहे.
रिक्षाचा तोल जातो
व्हिडिओमध्ये आपल्याला रस्त्यावर एक व्यक्ती दिसत आहे. समोरून एक तीन चाकी प्रवाशांची रिक्षा येत आहे. अचानक रस्त्यावरील व्यक्ती त्या रिक्षावर फुगा फेकतो. त्यानंतर रिक्षाचा तोल जातो आणि रिक्षा पुढे काही फूट फटफटत जाते आणि थांबते.
The auto overturned on the road after throwing a water-filled balloon on the occasion of Holi. The video is from UP. pic.twitter.com/eErY36cMMI
— Abhishek Anand (@TweetAbhishekA) March 19, 2022
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
या घटनेत किती लोक जखमी झाले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सोशल मीडियावर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. रंगांचा सण, होळी शुक्रवारी संपूर्ण भारतभर साजरी करण्यात आली, परंतु काही भागांमध्ये शनिवारीही उत्सव सुरूच होता. त्याचदरम्यान ही दुर्घटना झाल्याचे दिसत आहे.