Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय? पाहा, ‘ताडोबा’तला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग
अस्वलाने (Bear) वाघासमोर (Tiger) आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन केले आहे. होय. वाघाला सर्वच प्राणी घाबरतात मात्र या अस्वलाने असे काही केले की वाघही पाहतच राहिला. चंद्रपुरातील ताडोबा (Tadoba-Andhari National Park) व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ (Video) आहे.
चंद्रपूर : अस्वलाने (Bear) वाघासमोर (Tiger) आपल्या आक्रमक मुद्रेचे प्रदर्शन केले आहे. होय. वाघाला सर्वच प्राणी घाबरतात मात्र या अस्वलाने असे काही केले की वाघही पाहतच राहिला. चंद्रपुरातील ताडोबा (Tadoba-Andhari National Park) व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडिओ (Video) आहे. जंगली प्राणी आणि त्यांच्या करामती आपण नेहमीच पाहत असतो. आता अस्वलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अस्वलाने वाघासमोरच आपल्या आक्रमकतेची चुणूक दाखवली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात समोरा-समोर आलेल्या वाघ आणि अस्वलाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आणि अनोखे दृश्य लखनऊच्या नमन अग्रवाल या पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केले आहे. सोमवारी दुपारी टायगर सफारीच्या दरम्यानची ही घटना आहे.
आक्रमक अस्वल
आक्रमणाच्या मुद्रेत असलेल्या वाघाला अस्वलाने दोन्ही पायावर उभे होत प्रतिहल्ल्याचा इशाराच दिलाय जणू, असे व्हिडिओ पाहताना आपल्याला दिसून येईल. दुसरीकडे आक्रमणाचा इशारा मिळताच वाघ शांत झाल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर अस्वल आपल्या वाटेने जातो. वाघ हा जंगलाचा राजा मानला जातो. जवळपासही फिरकला तर इतर प्राणी अक्षरश: म्हणतात ना, की दुम दबा के भागा… तसे पळून जातात. अनेक प्राणी जे सावध नसतात, त्यांना त्यांच्या भाषेत इशारे करतात, म्हणजे जवळ धोका आहे, तुम्ही दूर जा, असा त्या इशाऱ्याचा अर्थ…
Video : तुला घाबरतो असं वाटलं की काय..? पाहा ताडोबातला अस्वलाचा ‘हा’ स्वॅग#tadoba #TIGER #bear #wildlife #animals #chandrapur अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmGZMLmk pic.twitter.com/HbjFeaaY7T
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2022
दबा धरून बसला, पण…
वाघ या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, तो मात्र कोणालाही घाबरत नाही. समोर दिसणाऱ्या प्राण्याचा फडशा पाडणे एवढेच त्याचे काम… आणि या कामात त्याचा हात मात्र कोणीही धरू शकत नाही. आता व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला, तर लक्षात येते, की वाघ अस्वलावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तो दबा धरून बसला असल्याचे दिसते. मात्र अस्वलही काही कमी नाही. त्याने असा काही आक्रमक पवित्रा घेतला, की वाघ शांतच झाला.