मुलगी हिंदू असो वा मुस्लिम, या बाप माणसाच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडते, कारण

तुम्हाला प्रश्न पडेल, या मुली या माणसाजवळ एवढं ढसाढसा का रडतात, हा माणूस त्यांना अशी कोणती शिकवण आपल्या शब्दांमधून देऊन जातो की, त्या मुलींना त्यांच्या जन्मापासून भरभरुन प्रेम करणाऱ्या, त्यांचं आयुष्याचं जे सुरक्षा कवच असलेल्या त्या व्यक्तीबद्दल एवढं प्रेम ओसांडून येतं की डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाहीत.

मुलगी हिंदू असो वा मुस्लिम, या बाप माणसाच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडते, कारण
Image Credit source: vasant hankare
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 10:05 PM

मुंबई | 11 सप्टेंबर २०२३ | हा माणूस कॉ़लेज, शाळा या ठिकाणी जातो, तेथील मुलींशी संवाद साधतो. या माणसाला ऐकून मुली ढसाढसा रडतात, या माणसाच्या छातीवर डोकं ठेवून मुली रडतात. या मुलींच्या, महिलांच्या मनातील अशा कोणत्या हळव्या कोपऱ्याशी हा माणूस बोलतो, की ते मनापर्यंत भिडतं आणि मुली आहेत, त्याच जागी बसून अश्रूंना वाट मोकळी करुन देतात. माणसाच्या एका चांगल्या मनाला हा व्यक्ती साद घालतो. मन रडतं, पण असं काय घडतं. अनेक पालक आजही आपल्या मुलींशी संवाद साधत नाहीत, तुमच्या मुलीचा तुम्ही मित्र होणं गरजेचं आहे, तिच्या मनातील एक एक गोष्ट तिने तुम्हाला सांगावी आणि तुम्ही जगातले आतापर्यंतचे बरे वाईट अनुभव घेतलेले असतील किंवा तुम्हाला माहित असतील, असे अनुभव तिच्याशी शेअर करणे गरजेचे आहे. यामुळे तिला आयुष्याची पुढील दिशा ठरवण्यास मदत होते.

वसंत हंकारे ही व्यक्ती देखील या मुलींना याविषयीचं सांगत असते, तुमच्या जन्मदात्याची किंमत तुमच्यासाठी किती अमुल्य आहे. तुम्ही त्यांच्या किती जवळ आहात, तुम्ही कसे त्यांचे प्राण आहात, आणि जेव्हा तुम्ही आयुष्याबद्दल निर्णय घेतात, आणि आईवडिलांना न विचारताच हा निर्णय घेतात, त्यानंतर तुमचं नुकसान झालं किंवा अचानक तुम्ही त्यांना सोडून गेलात, तर तुमच्याशिवाय तो बाप कसा कासाविस होतो. हे हा माणूस या मुलींना पटवून देत असतो. बाप तुमच्यासाठी काय असतो, आपण भाड्याच्या घरात अनेक वर्ष राहिलो तरी ते घर सोडताना आपलं मन दुखावतं, तुम्ही अचानक बापाला असं सोडून गेलात तर त्याला किती दु:ख होत असेल याचाही विचार करा.

मुलींनी कोणताही निर्णय घेताना, आईवडिलांनंतर आलेल्या व्यक्तीचं तुम्ही जेवढं ऐकून घेतात, त्यापेक्षाही कमी प्रमाणात का असेना आपल्या आईवडिलांचंही मत कोणताही मोठा निर्णय घेताना विचारात घ्या. तो बाप जो फाटलेले कपडे घालतो, वर्षानुवर्ष एकच चप्पल वापरतो, पण तुम्हाला ब्रॅण्डेड कपडे, शूज आणून देतो, त्यात उधार उसनवारी करतो की कर्ज काढतो, हे तो चेहऱ्यावर कधीच दिसू देत नाही, ही कला त्याला मुलीचा बाप झाल्यापासून अवगत झालेली असते, किती डोकवा बापाच्या मनात तो दु:ख तुम्हाला कधीच दिसू देत नाही. पापाची परी असं म्हणून तुम्ही कितीही बाप आणि मुलीच्या नात्याची मस्करी केली, तर बाप झाल्यावर बापासाठी मुलगी ही परीच्याही पुढे असते.

वसंत हंकारे हे मुलींना जरी ढसा ढसा रडवत असले, तरी ते त्यांच्या भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी, हे जग ओळखण्याची शक्ती, त्याच्या शब्दांच्या माध्यमातून या मुलींना देऊन जातात. जे बरे वाईट अनुभव त्यांच्या वाट्याला येतील, त्यात वाईट अनुभव कमीच येतील, पडून सावरण्यापेक्षा, पुढच्याच ठेच मागचा शहाणा, आणि ठेच लागण्याआधी केल्या जाणाऱ्या उपाय योजनाच जास्त महत्त्वाच्या असतात. यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर देखील उपलब्ध आहेत, हे व्हीडिओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या बापाची नक्कीच आठवण येईल, तुमच्या वडिलांना देखील तुम्ही असेच रडल्याशिवाय राहणार नाहीत, हे नक्कीच.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.