Video : जंगल सफारीवेळी गाडीत घुसला सिंह, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा!

जंगल सफारी दरम्यान सिंह उघड्या गाडीत घुसतो. यानंतर लोकांचे काय हाल होतात? हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हीच पाहू शकता.

Video : जंगल सफारीवेळी गाडीत घुसला सिंह, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा!
सिंह गाडीत घुसला
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 5:53 PM

तुम्ही अनेकदा जगंलात मोकळ्या कारमध्ये फिरत असताना भयंकर प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे तुम्ही एकाद्या हॉलिवूड चित्रपटात पाहिले असेल. आपल्या सर्वांना माहित असते की हा चित्रपटाचा फक्त एक भाग आहे आणि त्यात कुठेही तथ्य नाही. पण तरीही ते दृश्य पाहिल्यानंतर लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. आता जरा विचार करा की हे जर खरच कोणाच्या बाबतीत घडले तर मग काय होईल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये जंगल सफारीदरम्यान (Jungle Safari) सिंह (Lion) उघड्या गाडीत घुसतात. यानंतर लोकांचे काय हाल होतात, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडिओ केवळ 31 सेकंदांचा आहे, परंतु वाहनात उपस्थित पर्यटकांची अवस्था कशी झाली असेल याची कल्पना येऊ शकते. व्हिडिओच्या सुरुवातीला वाहन चालक हसताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी ड्रायव्हरच्या मागे एक सिंहीण झाडावर बसलेली दिसेल. गंमत म्हणजे सिंहीण ड्रायव्हरवर हल्लाही करत नाहीये. यानंतर समोर येणारे दृश्य तर आणखी धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक सिंह कारमध्येच घुसला आहे.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर नेचर27_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 8700 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सिंहांनी माणसांवर हल्ला का केला नाही, याचे युजर्सना आश्चर्य वाटते. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी देखील मजेदार टोनमध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘मला खूप आश्चर्य वाटते की सिंहांनी माणसांवर हल्ला का केला नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मी तिथे असतो तर माझी हालत खराब झाली असती…हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जंगलात फिरताना वाघ, सिंहाचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो त्यामुळे हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे.

Video : भाजी विकणारा माकड पाहून नेटकरी म्हणाले भावासोबत सौदेबाजीचा त्रास कोण घेईल…

नाद करा पण आमचा कुठं! Mahindra Thar ची चक्क शोरुममध्येच टेस्ट ड्राईव्ह, अखेर मदतीसाठी JCB मागवला

घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.