गरमीपासून बचाव करण्यासाठी व्यक्ती नदीत घेत होता विश्रांती, मृत समजून लोकांनी केला पोलिसांना फोन, व्हिडिओ व्हायरल

एका अहवालानुसार, ही व्यक्ती उष्णतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी नदीत डुलकी घेत होती. त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्याला मृत समजले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जे पाहून लोकही हसत आहेत.

गरमीपासून बचाव करण्यासाठी व्यक्ती नदीत घेत होता विश्रांती, मृत समजून लोकांनी केला पोलिसांना फोन, व्हिडिओ व्हायरल
गरमीपासून बचाव करण्यासाठी व्यक्ती नदीत घेत होता विश्रांती, मृत समजून लोकांनी केला पोलिसांना फोन, व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 4:20 PM

नवी दिल्ली : गरमीने हैराण झाल्याने लोक गारवा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करीत असतात. थंड पाणी पिऊन, कोल्ड ड्रिंक, सरबत पिऊन लोक गरमीपासून मु्क्तता मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका अवलियाने गरमीपासून मुक्तता मिळविण्यासाठी अशी भन्नाट युक्ती केली की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा सुरु आहे. वास्तविक, अमेरिकेच्या ओक्लाहोम राज्यातील टुल्सा शहरात, एक माणूस नदीत पडून विश्रांती घेत होता. पण लोकांनी त्याला ‘मृत’ समजून बचाव पथकाला फोन लावला. जेव्हा बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्या व्यक्तीला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण ज्याला ‘मृतदेह’ समजले जात होते तो जिवंत व्यक्ती होता. (The man was taking a rest in the river to escape the heat, people calling the police calling him dead)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

एका अहवालानुसार, ही व्यक्ती उष्णतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी नदीत डुलकी घेत होती. त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्याला मृत समजले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जे पाहून लोकही हसत आहेत. ‘द टुल्सा फायर डिपार्टमेंट’ ने 19 ऑगस्ट रोजी फेसबुकवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून 16,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 270 पेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना 18 ऑगस्ट रोजी घडली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, पाहिले जाऊ शकते की, बचाव दल, पिवळ्या रंगाच्या बोटीत बसून नदीत झोपलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि बचाव पथकाच्या एका सदस्याने त्या व्यक्तीला हलवताच तो उठून बसतो. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटते कारण ज्याला ‘मृतदेह’ असे सांगितले जात होते तो जिवंत होता. मग त्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर कळले की तो नदीत विश्रांती घेत होता.

अग्नीशमन दलाचे आवाहन

यानंतर, ‘अग्निशमन विभाग’ने फेसबुकवर लिहिले, ‘सध्या नदीची पाण्याची पातळी कमी असली तरी हा परिसर अजूनही संभाव्य धोकादायक आहे. म्हणून कृपया सुरक्षित रहा आणि गरमीपासून स्वतःचा बचाव करण्याचे इतर मार्ग शोधा. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रत्येकजण एकच सवाल करीत आहे की नदीत आराम करायला कोणी जातं का?. (The man was taking a rest in the river to escape the heat, people calling the police calling him dead)

इतर बातम्या

‘सालार’चं आणखी एक दणकट पोस्टर पाहिलात का? प्रभासच्या नव्या फिल्मची उत्सुकता, केजीएफच्या फॅन्ससाठी नवी पर्वणी

पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.