Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका

Police video : सणासुदीच्या दिवशी काम करणे कसे वाटेल? असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. उत्सवातही पोलिसांना काम करावे लागते. त्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे.

Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला...; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका
गाण्यातून आपली व्यथा मांडणारा पोलीस कर्मचारीImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 7:30 AM

Police video : सणासुदीचे दिवस असले, की घराच उत्साहाचे वातावरण असते. नवनवीन स्वादिष्ट खाद्यपदार्थ, नवे कपडे असा एकूण माहौल असतो. बाहेरही तेच. बाजारपेठा सजलेल्या असतात. सर्वत्रच प्रसन्न वातावरण असते. विशेष म्हणजे आपण सर्वजण आनंदी असतो. शिवाय आपल्याला कामाला जाण्याचे टेन्शन नसते. सुट्टी असल्यामुळे आपण बिनधास्त असतो. मग विचार करा, सणासुदीच्या दिवशी काम करणे कसे वाटेल? कोणालाच काम करायला आवडत नाही. पण असे अनेक लोक आहेत, ज्यांना सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागते. कदाचित रोजच्यापेक्षाही जास्त. आता विचार करा, त्यांची काय अवस्था होत असेल. पोलीस तर त्याच्यामध्ये सर्वात वर आहेत. त्यांना कोणताही सण घरच्यांसोबत साजरा करता येत नाही. कारण उत्सवाच्या दिवसात तर त्यांना अधिकचे काम करावे लागते. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे.

पोलिसाचे मूल म्हणते….

व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी दिसत आहे. तो एक गाणे गात आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य कसे असते, हे या कर्मचाऱ्याने गाण्याच्या स्वरुपात सांगितले आहे. गाण्यामध्ये पोलिसाचे मूल आणि त्याच्या आपल्या वडिलांविषयीच्या भावना आहेत. ते मूल मनालाच बोलत असते आणि म्हणत असते, की एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…

यूट्यूबवर अपलोड

वर्षभरात येणारे सण, पोलीस करत असलेली मेहनत, मिळणारा पगार या सर्व गोष्टी या गीतात मांडल्या आहेत. थोडक्यात पोलिसांच्याही काही व्यथा आहेत. त्या या व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या आहेत. यूट्यूबवर हा व्हिडिओ मीडिया मराठी (Media Marathi) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अडचणी ऐकून यूझर्सही भावनिक झाले आहेत.

आणखी वाचा :

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्चा

Snake & Frog : …अन् धोकादायक सापाच्या तावडीतून सुटतो बेडून, लोकांनी हिंमतीला दिली दाद

उकळल्या धातूमध्ये पुन्हा पुन्हा घालतोय हात; व्हिडिओवर Elon Musk यांनी केली कमेंट, म्हणाले…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.