बायकोच्या 2 बहिणींनाच पटवलं, अन् लग्नही केलं, आता 13 मुलं,बायकोही खूश आणि बहिणीही!

आता तुम्ही म्हणाल, हे घडलं तरी कसं? या मुलाने असं काय केलं की, त्याला अजून 2 लग्न करण्याची परवानगी मिळाली?

बायकोच्या 2 बहिणींनाच पटवलं, अन् लग्नही केलं, आता 13 मुलं,बायकोही खूश आणि बहिणीही!
3 बायका, 13 पोरं, तरी चाललंय कसं बरं?
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 2:47 PM

मंडळी, इथं पोरांना लग्नाला पोरी भेटत नाही, लग्नाळूंची (Marrige) संख्या भारतात दिवसेंदिवस चांगलीच वाढतेय, मात्र, ही परिस्थिती सगळीकडे नाही. काही ठिकाणी याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळतं. जगात अशाही घटना घडतात, जिथं या सगळ्या गोष्टींना फाटा दिला जातो. आणि जिथं एक नवरोबा आणि अनेक नवऱ्या (Bride And Groom) असंही पाहायला मिळतं, विशेष म्हणजे यातील कुठल्याही बायकोला, दुसऱ्या बायकोपासून काहीही त्रास नसतो. अशीच एक घटना (Viral Video) समोर आली आहे, जिथं एका महाशयांनी चक्क 3 बायकांसोबत (Polygami) लग्न केलं, त्यांना 13 मुलं झाली आणि विशेष म्हणजे हे सगळे सुखानं नांदताहेत.

आफ्रिकेतल्या एका लहानशा गावातील कुटुंबाची ही कहाणी.इथं एक कुटुंब आहे, मुलाचं नाव ओम्बेनी आणि त्याच्या 3 बायका क्रिस्टीन, एलीन आणि टूमा. आता तुम्ही म्हणाल, हे घडलं तरी कसं? ओम्बेनीने असं काय केलं की, त्याला अजून 2 लग्न करण्याची परवानगी मिळाली?

तर ऐका, ओम्बेनीने सर्वात आधी क्रिस्टीनशी लग्न केलं, लग्नानंतर त्यांना मुलंही झाली, मात्र काही काळातच त्याला क्रिस्टीनची लहान बहीण एलीनही आवडू लागली. एलीनच्या मनातही ओम्बीनीबद्दल प्रेम होतंच, पण ते व्यक्त होत नव्हतं. मग काय मनातलं ओठावर आलं. पण आता क्रिस्टीनला मनवायचं कसं हा प्रश्न होतं. मन घट्ट करुन ओम्बेनीने सगळं क्रिस्टीनला सांगितलं, पण काय आश्चर्य, क्रिस्टीन चक्क तयार झाली. लहान बहिण आयुष्यभर आपल्या सोबत राहिल, हे तिच्यासाठीही सुखावणारं होतं. विवाह झाला आणि एलीन घरात आली.

हे सुद्धा वाचा

ओम्बेनी एवढ्यावरच थांबला नाही, क्रिस्टीन आणि एलीनची लहान बहिण टूमाही ओम्बेनीला आवडू लागली, पुन्हा तीच प्रेमाची झुळूक त्याच्या आयुष्यात आली, आणि टूमासोबतही तेच घडलं जे आधी एलीनसोबत घडलं होतं. टूमाही ओम्बेनीसोबत विवाहबंधनात अडकली.

पाहा व्हिडीओ:

आता ओम्बेनीसोबत क्रिस्टीन, एलीन आणि टूमा अशा 3 बहिणी सुखी संसार करतात. त्यांना 13 मुलंही झाली, या तिन्ही बहिणी, ओम्बीनी मिळून या 13 मुलांचा सांभाळ व्यवस्थित करतात. पॉलिगामी म्हणजेच बहुपत्नीत्व असणारं हे कुटुंब अगदी चांगलं नांदतंय. तिन्ही बहिणींचं एकमेकीशी ट्युनिंग अगदी चांगलं आहे.

तिघी सांगतात की, आम्ही तिघींनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत, प्रत्येकीची कामं ठरलेली आहे. कामातून प्रत्येकीला स्वत:साठी वेळ मिळेल असं नियोजन करण्यात आलं आहे. ओम्बेनी सांगतो की, आता कुटुंब मोठं झालं आहे. कुटुंबाच्या गरजाही वाढल्या आहे, कुटुंबात कमावणारे कमीच आहेत, त्यामुळे आर्थिक अडचण होते, पण काही काळात सर्व कामाला लागल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा ओम्बेनीला विश्वास आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.