Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?

Car accident : हा व्हिडिओ (Video) कार चालवणाऱ्या मुलींशी संबंधित आहे. ओव्हर स्मार्टनेसमुळे (Oversmart) त्या गाडीसह स्वत:लाही अडचणीत (Trouble) आणतात. मुलींनी अतिशय अरुंद जागेतून गाडी काढण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?
अरुंद जागेतून कार काढण्याच्या प्रयत्नात कार होते पलटीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 12:50 PM

Car accident : बरेच लोक स्वतःला इतके हुशार समजतात, की ते कोणालाही जुमानत नाहीत. सोशल मीडियावर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये लोक ओव्हर स्मार्ट होताना, स्टंट करताना दिसतात. मात्र, कधी कधी हा अति-स्मार्टनेस त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Video) कार चालवणाऱ्या मुलींशी संबंधित आहे. कारमध्ये दोन मुली बसल्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्या पूर्ण झोकात कार चालवत आहेत. दरम्यान, ओव्हर स्मार्टनेसमुळे (Oversmart) त्या गाडीसह स्वत:लाही अडचणीत (Trouble) आणतात. मुलींनी अतिशय अरुंद जागेतून गाडी काढण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान कार पूर्णपणे वाकडी होते. त्यानंतर कार उलटली. त्यामुळे मुलींचा जीवही अडचणीत येतो.

जबरदस्तीने कार अरुंद जागेतून काढली

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एका रस्त्यावर बस उभी आहे. हा डोंगरी रस्ता आहे. बस आणि टेकडी मध्ये खूप अरुंद जागा शिल्लक होती. तरुणी या मार्गाने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये असे दिसून येते, की बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत कारची दोन चाके टेकडीवर आणि दोन चाके रस्त्यावर आहेत. यादरम्यान हा सर्व प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर जबरदस्तीने कार बाहेर नेल्याची धक्कादायक घटना घडते.

कार बस ओलांडताच उलटली

व्हिडीओमध्ये दिसत आहे, की कार बस ओलांडताच ती झुकल्यामुळे उलटली. त्यामुळे गाडीत बसलेल्या मुली स्वत:च्या चुकीमुळे अपघाताच्या बळी ठरतात. यानंतर मुली हसत हसत गाडीतून बाहेर पडतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

आणखी वाचा :

9 महिन्यांच्या गर्भवतीप्रमाणं वाढलंय या व्यक्तीचं पोट! कशामुळे झालंय असं? ‘ही’ बातमी वाचा

‘या’ माकडाचा खोडकरपणा पाहा, शेळीला कसा देतोय त्रास? Funny video viral

Viral : गालावर खळी हवीये? ‘हिनं’ केला अनोखा Jugaad; Videoमध्ये पाहा, काय Trick वापरली…

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.