Viral: बाताओ कितने कुत्ते थे? बहुत! और चुहा? सिर्फ एक, सिर्फ एक! मरता मरता वाचला ना उंदीर…
पण हर कुत्ते का दिन आता है...दरवेळीच असं कसं होईल? कधीतरी कुत्र्याला उंदीर सापडणारच नाही, सापडला तर तावडीत येणार नाही. पण कधी कुणी असा विचार करू शकतं का कि कुत्रा उंदरावर हल्ला करताना माणूसच कुत्र्याला मदत करू शकतो? एक माणूस नाही अनेक माणसं. ते पण एकाच उंदराला!
कुत्रा (Dog) उंदराला खाईल, उंदीर अजून कुठल्या प्राण्याला अशी एक अन्नाची साखळी असते. उंदीर तर अगदीच कुत्र्यापुढे छोटासा, इवलुसा, कुत्र्याने ठरवलं तर काही वेळातच काम तमाम. पण हर कुत्ते का दिन आता है…दरवेळीच असं कसं होईल? कधीतरी कुत्र्याला उंदीर सापडणारच नाही, सापडला तर तावडीत येणार नाही. पण कधी कुणी असा विचार करू शकतं का कि कुत्रा उंदरावर हल्ला करताना माणूसच कुत्र्याला मदत करू शकतो? एक माणूस नाही अनेक माणसं. ते पण एकाच उंदराला! याची कल्पनाच (Imagination) किती मजेदार आहे. अमेरिकेत असंच काहीसं घडलं. एका इवलुश्या उंदराला खूप साऱ्या माणसांनी एका कुत्र्यापासून वाचवलं आणि त्याचा व्हिडीओ वायरल (Video Viral) झाला.
…एवढ्यात लोकं त्या उंदराला वाचवतात
हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हे प्रकरण न्यूयॉर्कमधलं असल्याचं सांगण्यात येतंय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उद्यानात एक उंदीर धावत आहे आणि अनेक कुत्रे त्याचा पाठलाग करत आहेत. ते त्याच्यावर हल्ला करतात. एक कुत्रा तर त्या उंदराला तोंडात पकडतो आणि उंदीर मरणार एवढ्यात लोकं त्या उंदराला वाचवतात. उंदीर तर अक्षरशः मरता मरता वाचतो! 13 सेकंदाच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाल्याचं मी तुम्हाला सांगतो.
Live from New York City pic.twitter.com/ziN3NZrWhR
— dinny (@dinfowars) May 24, 2022
लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. हे लोक उंदराला का वाचवत आहेत हे समजत नसल्याचं एकानं म्हटलंय तर त्याचवेळी दुसऱ्याने कमेंट केली की, उंदरांच्या या पार्कमध्ये कुत्रे काय करत आहेत? पण या व्हिडिओत सातत्याने एक गोष्ट मात्र दिसतीये ती म्हणजे कुत्र्यांचे मालक त्यांना उंदरावर हल्ला करू नये म्हणून प्रयत्न करतायत.
हा व्हिडीओ बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओज समोर येत असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे लोकांची मनं जिंकतात. असाच एक व्हिडिओ चीनमधील सिचुआन काउंटीमधून समोर आलाय. खरंतर इथे भूकंप झाला होता, त्यानंतर शाळेच्या क्लासमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिव्यांग वर्गमित्राला कसं वाचवलं, एवढ्या अटीतटीच्या वेळी सुद्धा त्यांनी जसेच्या तसे बाहेर काढले. व्हिडीओ बघून तुमचाही माणुसकीवर विश्वास बसेल. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.