‘या’ आहेत दुबईच्या सहा सर्वांत श्रीमंत गृहीणी.. एकीला तर घटस्फोटातून मिळाले केाट्यावधी रूपये !

'द रियल हाउसवाइव्हज' हा एक टेलिव्हिजन शो आहे, ज्याच्या जगभरात अनेक मालिका आहेत. या फ्रेंचायझीच्या दुबई मालिकेचा प्रीमियर 1 जून 2022 रोजी झाला. यामध्ये एकूण संपत्तीच्या आधारे दुबईतील 6 सर्वांत श्रींमत गृहिणी असलेल्या महिलांची नावे समोर आली आहेत.

‘या’ आहेत दुबईच्या सहा सर्वांत श्रीमंत गृहीणी.. एकीला तर घटस्फोटातून मिळाले केाट्यावधी रूपये !
श्रीमंत गृहीणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:45 PM

द रिअल हाउसवाइव्हज‘ (‘The Real Housewives‘) ही एक अमेरिकन रिअॅलिटी टेलिव्हिजन मालिका आहे. तीच्या फ्रँचायझीची सुरुवात ‘द रिअल हाऊसवाइव्हज ऑफ ऑरेंज काउंटी’ पासून झाली, ज्याचा पहिला प्रीमियर 21 मार्च 2006 रोजी कॅलिफोर्नियात झाला. व्हँकुव्हर, मेलबर्न, चेशायर, ऑकलंड, सिडनी, जोहान्सबर्ग, हंगेरी, अथेन्स नंतर दुबईतही या फ्रँचायझीची मालिका सुरू झाली. रिअल हाऊसवाइव्ह्ज फ्रँचायझीची पहिली मालिका दुबई, UAE शहरात राहणाऱ्या अनेक महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित (Focus on professional life)होती. द रिअल हाउसवाइव्हज ऑफ दुबई-2022 चा प्रीमियर 1 जून 2022 रोजी झाला. यामध्ये दुबईतील 6 श्रीमंत गृहिणी (6 richest housewives in Dubai) असलेल्या महिलांची नावे जाहीर करण्यात आली. नेट वर्थच्या आधारे दुबईतील 6 सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत? याबाबत तुम्हाला माहिती आहे का.

1.कॅरोलिन स्टॅनबरी

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लंडनमध्ये जन्मलेली कॅरोलिन स्टॅनबरी, ज्याने लेडीज ऑफ लंडन (2014) या शोमध्ये भूमिका केली होती, ती दुबईची सर्वात श्रीमंत गृहिणी आहे. त्यांची मालमत्ता सुमारे 232.70 कोटी रुपये (US$30 डॉलर) आहे. कॅरोलिनच्या पहिल्या पतीचे नाव सॅम हबीब होते, ज्यांच्यापासून तिला तीन मुले होती. मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर तिला पहिल्या पतीकडून सेटलमेंटसाठी भरभक्कम रक्कम मिळाली होती. कॅरोलिनच्या सध्याच्या पतीचे नाव सर्जियो कॅरालो आहे, जो माजी फुटबॉल खेळाडू आहे. कॅरोलिन सध्या ‘कॅरोलिन स्टॅनबरी’ शू लाइनची मालक आहे. जी जगातील सर्वात लक्झरी शू ब्रँड मानली जाते.

2. लेसा मिलान

माजी मिस जमैका, विजेती आणि फॅशन डिझायनर लेसा मिलान नेट वर्थच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती 31.7 ते 571 लाख (5ते 9 लाख डॉलर) आहे. लेसा मिला मिना रो मॅटर्निटी नावाच्या कपड्यांच्या ब्रँडची मालक आहे. दुबईला येण्यापूर्वी, मिलान जमैकाहून मियामीला गेली होती आणि तिथे 8 वर्षे राहिली तीथे, तीने लक्षाधीश विकासक रिचर्ड हॉलशी लग्न केले, आणि तिला तीन मुले आहेत. मिलनला प्रवास आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे.

हे सुद्धा वाचा

3. कॅरोलिन ब्रुक्स

25.39 ते 38.09 कोटी (4 ते 6 लाख डॉलर्स) संपत्तीसह कॅरोलिन ब्रूक्स UAE मधील तिसरी सर्वात श्रीमंत गृहिणी आहे. कॉस्मोपॉलिटन मिडल इस्टच्या मते, ब्रूक्सने दुबईतील प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्मचे संचालक म्हणूनही काम केले आहे. इंस्टाग्राम बद्दल बोलायचे तर, या महिलेचे 2.20 लाख व्यवसायीक फॉलोअर्स आहेत आणि अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ती झळकली होती. ती Glass House Salon & Spa नावाचे सलून चालवते.

4. अयान चॅनल

सुपरमॉडेल चॅनेल अयान रियल हाउस वाइव्हज दुबई मालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. केनियामध्ये जन्मलेली, ती अनेक फॅशन मासिकांच्या मुखपृष्ठावर तसेच सोमाली आणि इथिओपियन सौंदर्यस्पर्धेत दिसली आहे. ती एक यशस्वी व्यावसायिक आहे जिच्याकडे टॅलेंट एजन्सी आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट टोनी माल्ट यांच्यासोबत मेकअप आणि स्किनकेअर ची संपुर्ण व्यवसायीक चैन आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे ६.३४ कोटी (१ दशलक्ष) आहे.

5. सारा अल मदनी

सारा अल मदानीने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 200 हून अधिक भाषणे देणारी ती एक चांगली वक्ता देखील आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, मदनी सध्या हलही ची मालकीण आहे. हलही हि कंपनी सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ तयार करुन देण्याचे काम करते.सारा अल मदनीची एकूण संपत्ती सुमारे ६.३४ कोटी आहे.

6. नीना अली

लेबनॉनमध्ये जन्मलेली, टेक्सासमध्ये वाढलेली नीना अली या यादीत सर्वात खाली आहे. 2011 मध्ये ती तिचा बिझनेसमन पती मुनाफ अलीसोबत दुबईला आली होती. इंस्टाग्रामवर तिचे ५.२१ लाख फॉलोअर्स आहेत. परंतु, तिच्या एकूण संपत्तीची माहिती समोर आलेली नाही. या सर्व श्रीमंत महिलांबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.