लग्न जुळविणारं झाड कधी पाहीलं आहे का? या ब्राईडग्रुम्स ओक ट्रीने हजारोंची लग्नं लावली

सध्या अनेक मोबाईल डेटींग एप बाजारात आली आहेत. परंतू पूर्वी अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. तेव्हा एक झाड मॅचमेकरचं काम करायचं.

लग्न जुळविणारं झाड कधी पाहीलं आहे का? या ब्राईडग्रुम्स ओक ट्रीने हजारोंची लग्नं लावली
matchmaker tree Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 10:22 PM

नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गात जुळतात असं म्हटलं जातं. परंतू एका झाडामुळं लोकांच्या जोड्या जुळत असतील तर त्याला काय म्हणावे. एका पाचशे वर्षांच्या ओक वृक्षामुळे अनेकांचा आपल्या जीवनसाथीचा शोध संपला आहे. या झाडाच्या कृपेने अनेकांची लग्न लागल्याने त्याला बॉटनिकल मॅचमेकींग ट्री म्हणतात. लग्नगाठ जुळल्याने या झाडाला नॉटहोल म्हणतात. एका अख्यायिकेनूसार पाचशे वर्षांच्या ब्राईडग्रुम्स ओक ट्री मुळे अनेकांची लग्नगाठ जुळल्याने त्याला मॅचमेकर ट्री देखील म्हटले जाते. त्याने आतापर्यंत अनेकांची लग्न जुळविली आहेत.

सध्या अनेक मोबाईल डेटींग एप बाजारात आली आहेत. परंतू पूर्वी अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती. तेव्हा एक झाड मॅचमेकरचं काम करायचं. जर्मनीत असलेल्या या ओक वृक्षामुळे लोकांना चांगली स्थळ शोधण्याचा त्रास वाचत आहे. या झाडाच्या ढोलीत लोक स्वत:ची माहीती आणि पोस्टल पत्ता लिहिलेली चिट्टी टाकतात. त्यानंतर ज्याला चांगल स्थळ हवे असेल तो किंवा ती स्वत: येऊन येथील चांगल्या स्थळाशी संपर्क करायचा अशा प्रकारे अनेकांचे विवाह झाडामुळे होऊ लागले. मॅचमेकर ट्री म्हणून या झाडाची प्रसिध्दी झाल्याने सन 1927 मध्ये या झाडाला स्वत:चा पोस्टल एड्रेस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मग काय जे लोक लांब रहातात ते लोकही आपला परिचय आणि पत्ता लिहून या झाडाच्या पत्त्यावर पाठवू लागले. त्यामुळे दरदिवशी या झाडाला शेकडो पत्रं येऊ लागली.

कसे झाले झाड मॅचमेकर 

एकदा काय झाले एका वनअधिकाऱ्याच्या मुलीचे एका चॉकलेट तयार करणाऱ्या तरुणाशी प्रेमजुळले. परंतू तिच्या फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या वडीलांना हे नातं काही पसंत नव्हते. त्यामुळे या दोघा प्रेमींनी या ओक झाडाच्या ढोलीचा वापर आपल्या प्रेमाच्या संदेशाची देवाण-घेवाण करण्यासाठी सुरु केला. अखेर दोघांचे प्रेम पाहून फॉरेस्ट अधिकाऱ्यांचे मन पाघळले आणि त्यांनी दोघांच्या लग्नाला अखेर परवानगी दिली. त्या दोघांनी याच झाडाखाली आपला विवाह केला. त्यामुळे अनेकजण या झाडा भेट देऊ लागले. मग काय पुढे याच झाडाची ती पत्रांची ढोली नॉटहोल म्हणून प्रसिद्ध झाली.

पोस्टमनचंही झाडामुळे जुळलं

या झाडास पोस्टल एड्रेस मिळाल्याने येथे नेहमीच पत्रे टाकणारे पोस्टमन कार्ल हेनीझ मार्टेन यांचा एकदा टीव्हीवर इंटरव्हयूव झळकला. हा इंटरव्यूव पाहून त्यांच्या होणाऱ्या जीवनसाथीने त्यांना पसंत केले आणि त्यांचे अखेर झाडामुळे मिलन झाले.

एकट्यानेच कर्तव्य पार पाडत आहे

अनेक वर्षे एकटयाने सेवा दिल्यानंतर या झाडाचे लग्न जर्मनीतील एका अशाच पोस्टल एड्रेस असणाऱ्या झाडाशी लावण्यात आले. परंतू दुर्देवाने ते झाड बुरशीमुळे मरण पावले. त्यानंतर हे एकटे झाड अजूनपर्यंत दुसऱ्या जीवांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.