धोनी सारखी हेलिकॉप्टर शॉट मारणारी मुलगी, तुम्हीही म्हणाल महिला क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल!
सोशल मीडिया युजर्स या मुलीचे फलंदाजीचे प्रचंड चाहते बनले आहेत. कोणी म्हणतेय की ती धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारत आहे, तर कोणी महिला क्रिकेटमध्ये भारताचे भवितव्य सोनेरी आहे असं म्हणतंय.
सोशल मीडियावर एका लहान मुलीचा नेट प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात मुलगी आपल्या बॅटने असे भन्नाट शॉट्स मारताना दिसत आहे की तुम्ही बघतच बसाल. विश्वास ठेवा, व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप भारी वाटेल. सोशल मीडिया युजर्स या मुलीचे फलंदाजीचे प्रचंड चाहते बनले आहेत. कोणी म्हणतेय की ती धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट मारत आहे, तर कोणी महिला क्रिकेटमध्ये भारताचे भवितव्य सोनेरी आहे असं म्हणतंय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी खूप शॉट्स मारतीये. या व्हिडिओत मुलीची फूटवर्क आणि बॅटिंग स्टाईल पाहण्यासारखी आहे. ती ज्या प्रकारे एकापाठोपाठ एक शॉट्स मारत आहे ते पाहता येत्या काळात ती क्रिकेट विश्वात नक्कीच आपलं नाव कमवेल असं वाटतं. या व्हिडिओमध्ये ही मुलगी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीच्या स्टाईलमध्ये हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, ‘माझे आवडते ‘हेलिकॉप्टर शॉट’ आहे. तुला काय आवडलं? 43 सेकंदाची ही क्लिप वेगाने व्हायरल होत आहे. त्याचबरोबर लोक व्हिडिओला लाइक आणि शेअर करत आहेत. याशिवाय युजर्सने कमेंट करून भरभरून कौतुक केलंय.
My fav is the ‘helicopter shot’☄️ What’s your pick? pic.twitter.com/q33ctr0gnH
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 23, 2023
एका युजरने म्हटले आहे की, ‘महिला क्रिकेटमध्ये भारताचे भवितव्य सोनेरी दिसत आहे’, तर दुसऱ्या युजरने विचारले आहे की, ‘हे मूल कोण आहे सर?’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘अर्थातच हेलिकॉप्टर शॉट आमचा फेव्हरेट आहे. तथापि, या मुलीचा प्रत्येक शॉट आश्चर्यकारक आहे. एकूणच या मुलीचा हा व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला आहे.