Viral Solar Bike : अबे कमाल केली ना या पोट्ट्यांनी! बनवून टाकली सात आसनी सोलर बाईक, प्रवास करा की फुकटात
Viral Solar Bike : भारतात हटके काहीतरी करुन दाखविणाऱ्यांची काही कमी नाही. आता या मुलाने सोलर पॅनल आणि इतर काही वस्तूपासून थेट सोलर बाईकच तयार केली. त्याच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल दिग्गज उद्योजकांनी पण घेतली आहे.
नवी दिल्ली : भारतात टॅलेन्टची काही कमी नाही. हटके काही तरी करुन दाखवणाऱ्यांची संख्या तर कमाल आहे. पण त्यांना प्रोत्साहन देणारी, बॅकअप देणारी मोठी यंत्रणाच भारतात उपलब्ध नाही. आता या तरुणानेच बघा ना, हा हटके प्रयोग केला आहे. भारतात तंत्रज्ञानाआधारीत अनेक देशी जुग्गाड (Desi jugaad) आपण अनेकदा पाहिले आहे. कमी खर्चात, काम चलावू नाही तर फायदेशीर उपकरणे तयार करणारे अनेक देशी कलाकार आपण आपल्या अवतीभोवती नेहमी पाहतो. त्यांच्या कल्पनाशक्तीला योग्य वाव मिळाला तर देशात खऱ्या अर्थाने तळागाळात स्टार्टअप (Startup) वाढीस लागतील. त्यांना योग्य दिशा दिल्यास चीन सारखी प्रगती आपण साधू शकतो. आता या तरुणाचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओच पाहा ना…
सेव्हन सीटर सोलर बाईक हा व्हिडिओ कुठला आहे, हे तरुण कोणत्या भागातील आहे, हे स्पष्ट होत नाही. पण या तरुणाची कल्पकता, त्याचे टॅलेंट दिसून येते. त्याच्याकडे असलेल्या साध्या साध्या वस्तू आणि साहित्याचा वापर करुन त्याने ही साधी सेव्हन सीटर सोलर बाईक तयार केली आहे. या बाईकवर त्याच्यासह त्याचे सहा साथीदार पण दिसून येतात. या देशी जुगाडची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे.
So much sustainable innovation in one product – produced from scrap, seven seater vehicle, solar energy and shade from the sun! Frugal innovations like this make me proud of our India! pic.twitter.com/rwx1GQBNVW
— Harsh Goenka (@hvgoenka) April 29, 2023
हर्ष गोयंका यांनी केले कौतुक दिग्गज उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या तरुणांचे हे देशी इनोव्हेशन शेअर केले आहे. अगदा साध्या साध्या साहित्यापासून त्याने ही सोलर बाईक तयार केली आहे. ही बाईक साधी असली तरी त्याच्या कल्पकतेचे उद्योजक हर्ष गोयंका यांनी कौतुक केले आहे. ही शाश्वत नवकल्पना (sustainable innovation ) अगदी भंगारातून ही सोलर बाईक तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अशा नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे मला भारतीय असल्याचा अभिमान होत असल्याची पुश्ती पण त्यांनी जोडली.
काय आहे सोलर बाईक या व्हिडिओत एक तरुण या सोलर बाईकची माहिती देताना दिसत आहे. भंगार आणि निरुपयोगी साहित्यातून त्याने ही बाईक तयार केली आहे. या बाईकवर सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. एकूण सात जण या बाईकवर बसलेले दिसत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर ही बाईक दोनशे किलोमीटर धावू शकते, असा दावा या तरुणाने केली आहे. या बाईकसाठी दहा हजार रुपयांचा खर्च आला आहे. पण ही बाईक चालविण्यासाठी इंधनाचा कुठलाही खर्च येणार नाही. त्यामुळे ही बाईक मोफत तुम्हाला सर्वत्र फिरवून आणेल.