AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या माणसाची हिंमत बघून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल, बंदूकधारी चोर समोर तरी…

विशेषतः सशस्त्र गुंडांसमोर धाडस दाखवण्याची चूक कधीही करू नये, अन्यथा क्षणार्धात आपला जीव गमवावा लागेल. पण अनेकदा असे होते की काही लोक शस्त्र असलेल्या गुंडांना देखील घाबरत नाहीत आणि त्यांच्यासमोर उभे राहतात.

या माणसाची हिंमत बघून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल, बंदूकधारी चोर समोर तरी...
Viral video
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 4:06 PM

मुंबई: जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या धाडसाच्या जोरावर काहीही करतात. मोठ्या अडचणींनाही ते हसतखेळत सामोरे जातात. मात्र, आजकाल फार कुणी धाडस दाखवताना दिसत नाही. लोकांचंही असं मत असतं की उगाचच धाडस करायला जाऊ नये. विशेषतः सशस्त्र गुंडांसमोर धाडस दाखवण्याची चूक कधीही करू नये, अन्यथा क्षणार्धात आपला जीव गमवावा लागेल. पण अनेकदा असे होते की काही लोक शस्त्र असलेल्या गुंडांना देखील घाबरत नाहीत आणि त्यांच्यासमोर उभे राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एका व्यक्तीने आपल्या धाडसाने सर्वांना चकीत केले आहे.

प्रकरण असं आहे की, काही लोक आरामात बसून मद्यपान करत असताना एक सशस्त्र गुंड लुटण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचतो. अशा वेळी सर्व लोक त्याच्या भीतीने इकडे तिकडे लपून बसतात, पण माणूस न घाबरता त्याच्या मस्तीत त्याच्या जागी बसतो. मग काय, दरोडेखोर ताबडतोब तिथे पोहोचतो आणि त्या व्यक्तीच्या हातातून मोबाइल हिसकावू घेतो, पण ती व्यक्ती त्याला मोबाइल द्यायला तयार नसते. मात्र, तो गुंड त्याला काहीच करत नाही, उलट तो टेबलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पैशांचा शोध घेऊ लागतो. त्याचवेळी ती व्यक्ती आरामात समोर बसून सिगारेट पेटवते आणि दारू पिण्याचा आनंद घेऊ लागते.

आता एखाद्या सशस्त्र गुंडासमोर असे धाडस दाखविण्याचे धाडस कोण करणार? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @cctvidiots नावाच्या आयडीसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक मिनिटांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5.9 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 59 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे आणि विविध मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

कुणी गंमतीने म्हणतंय की हा नवा जेम्स बॉण्ड आहे, तर कुणी म्हणतंय की त्या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल की तो शस्त्रधारी गुंडांना घाबरला नाही आणि आपलं काम करत राहिला.

सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
पंतप्रधानांचा चेहरा पाहता असं वाटतं.... संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल.
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....