Auto Driver | आता काय म्हणावे या नशीबाला, कंपनीचा मोठा अधिकारी झाला ऑटो ड्रायव्हर
Auto Driver | खेळ कुणाला दैवाचा कळला, हे मराठी गाणं तुम्ही ऐकलं असेलच. जगात केव्हा कुठे आणि कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला पण अशा अनेक चक्रावून टाकणाऱ्या घटना घडतात. स्टार्टअप सुरु करणाऱ्या सहसंस्थापकाने हा किस्सा शेअर केला आहे. तो अत्यंत धक्कादायक आहे.
नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : प्रत्येकाची काही स्वप्न असतात. काही जण स्वप्न जगतातही पण अचानक असा काही अनाकलनीय घडतं की होत्याचं नव्हतं होतं. अनेक मोठ्या पदावरची माणसं हलाखीचं जीवन कंठतात. राजाचा रंक होतो. तर रंकाचा राव होतो. जगात कुठे, केव्हा आणि काय घडले याची शाश्वती देता येत नाही. असाच एक किस्सा Momoney या स्टार्टअपचे सह संस्थापक मनस्वी सक्सेना यांनी शेअर केला आहे. ज्या ऑटोतून ते प्रवास करत होते. त्या ऑटोचा चालक एक मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्दावर होता. पण परिस्थितीने अशी काही कलाटणी घेतली की, त्याला ऑटो चालवावा लागत आहे. सक्सेना यांना हा धक्का सहन करणं अवघड गेलं, कोण आहे ती व्यक्ती, नेमकं झालं तरी काय?
बेंगळुरुतील किस्सा
बेंगळुरु जणू भारतातील सिलिकॉन व्हॅलची आहे. याठिकाणी प्रत्येक जण काहीतरी स्वप्न उराशी बाळगून प्रगती करतो. नवीन बिझनेस आयडियाज घेऊन अनेक तरुण बेंगळुरुमध्ये दाखल होतात. स्टार्टअप सुरु करतात. फंडिंग मिळवतात. आघाडी घेतात. मोमनीचे सहसंस्थापक मनस्वी सक्सेना यांनी ट्विटरवर (आताचे एक्स) शेअर केलेल्या एका सत्य घटनेने मात्र अनेकांना धक्का बसला. तो ज्या ऑटोतून प्रवास करत होत्या, त्याचा चालक हा काही दिवसांपूर्वी एका मोठ्या कंपनीचा चीफ ग्रोथ ऑफिसर असल्याचे त्याला समजले.
My Uber auto driver tonight was the Chief Growth Officer at @juspay, doing user research for @nammayatri.
If this isn’t @peakbengaluru then what is!
— Manasvi Saxena (@minusv_) October 10, 2023
नशीबाचे फासे पालटले
मनस्वी सक्सेना यांनी हा अनुभव शेअर केला आहे. त्यानुसार, हा ऑटो चालक फिनटेक कंपनी Juspay चे चीफ ग्रोथ ऑफिसर होता. आज रात्री मला घरी नेऊन सोडणारा ऊबरचा ऑटो चालक हा Juspay चा चीफ ग्रोथ ऑफिसर होता. तो युझर्स रिसर्चचे काम करत होता. त्याच्याशी बोलताना त्यांना हा प्रकार समजला. त्यांना धक्का बसला. मनस्वी सक्सेना हे मोमनी या मोबाईल पेमेंट एपचे सहसंस्थापक आहेत.
अचानक झाला खुलासा
उबर ऑटो बुक केल्यावर सहज चर्चा सुरु झाली. ऑटो ड्रायव्हर अत्यंत व्यवस्थित उत्तरं देत असल्याचे पाहून सक्सेना यांनी खोदून माहिती विचारल्यावर हा खुलासा समोर आला. त्यांनी ही बाब एक्सवर पोस्ट केल्यावर ही पोस्ट एकदम व्हायरल झाली. त्यावर लाईक्स, कमेंटचा पाऊस पडला.