AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Titanic Ship: अजूनही न उलगडलेली टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये!

Titanic Ship: या अपघातात दीड हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना अटलांटिक महासागरात घडली. टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेली की ते जगातलं न बुडणारं जहाज होतं, परंतु ते त्याच्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाले.

Titanic Ship: अजूनही न उलगडलेली टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये!
Titanic ShipImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 5:24 PM

आजही टायटॅनिकचा (Titanic) उल्लेख आला की त्याच्या अपघाताबद्दल पण बोललं जातं. असं म्हटलं जातं, टायटॅनिक बुडलं त्या वेळी परिस्थिती कशी असेल असा प्रश्न अनेकदा लोकांना पडतो. खरं तर त्या दुर्दैवी रात्री घडलेला टायटॅनिकचा अपघात इतका धोकादायक होता की त्याचे अवशेष शोधण्यासाठी सुमारे 75 वर्षे लागली. आतापर्यंत या घटनेबाबत जगभरातील शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले आहे, पण अजूनही काही रहस्ये अटलांटिक महासागरात (Atlantic Sea) दडलेली आहेत, जी रहस्य अजूनही उघड झालेली नाहीत. सुमारे 110 वर्षांपूर्वी म्हणजे 16 एप्रिल 1912च्या रात्री टायटॅनिकचा अपघात (Titanic Accident) झाला होता. हिमनगाशी त्याची धडक झाली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी टायटॅनिक सुमारे 41 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करत होते. ते इंग्लंडमधील साऊथॅम्पटनहून अमेरिकेतील न्यूयॉर्कला जात होता. 16 एप्रिलच्या रात्री जहाजावरील सर्व प्रवासी झोपलेले असताना टायटॅनिक हिमनगाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दीड हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना अटलांटिक महासागरात घडली. टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेली की ते जगातलं न बुडणारं जहाज होतं, परंतु ते त्याच्या पहिल्याच प्रवासादरम्यान बुडाले.

टायटॅनिकशी संबंधित काही रहस्ये, जे आजही उलगडलेले नाहीत

1. जगातील कधीही न बुडणारे जहाज बुडाले कसे?

जगातील सर्वात मोठे जहाज असलेल्या टायटॅनिकबद्दल एक गोष्ट सांगितली गेलीये की, ते कधीही न बुडणारे जहाज होते. मात्र, ते जहाज बनवताना टायटॅनिकची निर्मिती करण्यात आली, त्यात काही खास प्रकारचे डबे बांधले गेले, जेणेकरून जरी जहाज बुडण्याच्या स्थितीत असलं तरी ते ह्या डब्ब्यांमुळे बुडणार नाही असं एका तज्ज्ञाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, या संदर्भात जहाजाची अशी रचना करूनही ती कशी बुडाली याचा शोध शास्त्रज्ञांना घेता आलेला नाही. जहाजाच्या मुख्य भागाला अर्ध्या लांबीपर्यंत छिद्र पडल्याने टायटॅनिक जहाज बुडण्यापासून वाचू शकले नाही, असे अनेक सिद्धांत सांगतात.

2. ब्लू बँडने हजारो लोकांचा बळी घेतला होता का?

रिपोर्ट्सनुसार, अटलांटिक महासागरात जेव्हा हे जहाज भरधाव वेगाने धावते तेव्हा हा सन्मान दिला जातो, ज्याला ब्लू बँड मिळतो. टायटॅनिकही याच सन्मानास पात्र होते, त्यामुळेच ब्ल्यू बँड मिळवण्यासाठी अटलांटिकमध्ये त्याचा वेग वाढवण्यात आला, असा दावा अनेक अहवालांत करण्यात आला आहे. टायटॅनिक साऊथॅम्प्टन ते न्यूयॉर्क या आपल्या पहिल्या प्रवासाला निघाला होता, जो तो पूर्ण करू शकला नाही. अशा परिस्थितीत टायटॅनिकच्या वेगावरही प्रश्न उपस्थित केले जातात.

3. लोकांच्या मृत्यूचे हेच कारण आहे का?

अटलांटिकमध्ये झालेल्या त्या भीषण अपघातात 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे अनेक अहवालांत म्हटले आहे. इतक्या लोकांच्या मृत्यूचे एक मुख्य कारण म्हणजे त्या काळात लाइफ बोटींची संख्या कमी होणे आणि प्रवाशांसाठी केलेली सुरक्षा व्यवस्था. इतक्या लोकांच्या मृत्यूबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्याप कळू शकलेली नाहीत.

4. टायटॅनिक वेगाने अपघाताचे कारण आहे का?

टायटॅनिकच्या कॅप्टन स्मिथवर असाही आरोप होता की, त्याला लवकरात लवकर अटलांटिक पार करायचे आहे, त्यामुळेच तो जहाज वेगाने नेत होता. त्याचबरोबर कॅप्टन स्मिथ यांना लवकरात लवकर कोळसा संपवायचा असल्याने त्यांनी जहाजाचा वेग वाढवला होता, अशी माहिती अनेक अहवालांमध्ये देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत टायटॅनिकच्या वेगावर आणि कॅप्टन स्मिथवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

5. टायटॅनिकचे दोन तुकडे कसे झाले?

टायटॅनिकचे टू-पीस ब्रेकअप हा स्वतःच एक आश्चर्यकारक विषय आहे. त्यामुळे टायटॅनिकचे दोन तुकडे कशामुळे झाले, याचा शोध आजवर जगभरातील अनेक तज्ज्ञांना घेता आलेला नाही.

6. दुर्बीण असती तर दुर्घटना टळली असती का?

टायटॅनिक अपघाताचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रूसोबत दुर्बिण नसणे हेही सांगण्यात आले आहे. टायटॅनिकसारख्या महाकाय जहाजाच्या क्रू मेंबर्स आणि कॅप्टन्सकडे दुर्बिण का नव्हती, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. अनेक अहवालांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जर क्रूकडे दुर्बिण असती, तर त्यांनी धोका खूप आधीच वाफवला असता, ज्यामुळे इतका मोठा अपघात टळला असता आणि हजारो लोकांचे प्राण वाचले असते.

अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांची रहस्ये अद्याप उघडलेली नाहीत.

एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.