VIDEO | मित्रांसाठी किचनमधून अन्न चोरण्यासाठी कुत्र्याचा नवा जुगाड, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही
Trending Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तीन कुत्र्यांना भूक लागल्यानंतर त्यांनी जेवण घेण्यासाठी किचनमध्ये काय जुगाड केलाय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.
मुंबई : कुत्र्याला (dog viral video) सगळ्यात जास्त प्रामाणिक मानलं जात. कारण तो घराची राखण करतो, त्याचबरोबर मालक ज्या पद्धतीने आदेश देईल तसं तो वागत असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तीन कुत्र्यांनी एकत्र मिळून काय जुगाड (jugaad) केलाय, तो पाहायला मिळत आहे. एक कुत्रा आपल्या दोन सहकाऱ्यांसाठी किती जोखीम घेत आहे पाहा. ज्यावेळी मालक घरात नाही, त्यावेळी कुत्रा आपल्या दोस्तांच्या मदतीने अन्न कसं चोरुन खात आहे. या व्हिडीओला अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ (Trending Video) लोकांना अधिक आवडला आहे.
व्हिडीओने अधिक लोकांचं मन जिंकलं
या व्हिडीओने अधिक लोकांचं मन जिंकलं आहे. एक कुत्रा आपल्या मित्रांची कशा पद्धतीने मदत करीत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ घरातील भाऊ आणि दोस्ती यांचं एक मोठं उदाहरण आहे. त्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर चढून आपल्या दोस्तांची कशी मदत करीत आहे. व्हिडीओला पाहून तुम्ही सुध्दा अंदाज लावू शकता. तिथं असलेल्या एका व्यक्तीनं हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यामध्ये कुत्र्याची चोरी पकडली जात आहे. व्हिडीओतलं प्रेम पाहून अनेकांनी त्या व्हिडीओला कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
4.8 मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिला
इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा एप्रिल महिन्यात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 4.8 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 2 लाख 38 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहेत. व्हिडीओ पाहत असलेली लोकं विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत.