थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात…

आयुष्यातील धोके कमी व्हावेत म्हणून अनेक जण व्यायाम करतात, मात्र एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून व्यायाम करत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

थरकाप उडवणारा व्हिडीओ! इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील बाल्कनीला लटकून व्यायाम, नेटकरी म्हणतात...
बाराव्या मजल्याच्या गॅलरीला लटकून व्यायाम
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 5:45 PM

Exercise video : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची (Exercise) आवश्यकता असेत. तुम्हाला जर दीर्घकाळ निरोगी राहिचे असल्यास व्यायामाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच डॉक्टरांकडून (Doctor) नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. नियमित व्यायाम केल्याने तुमचे शरीर तर तंदुरुस्त राहातेच सोबतच तुमचे मन देखील मानसिक दृष्ट्या शांत राहाते. मनावरील तणाव दूर (Relieve stress) करण्यामध्ये देखील व्यायामाची महत्त्वाची भूमिका असते. नियमित व्यायाम केल्याने मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच हृदयविकार अशा विविध समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. त्यामुळे अनेक जण नियमित व्यायाम करताना दिसून येतात. सर्वच जण आयुष्यातील धोके कमी व्हावेत म्हणून व्यायाम करतात, मात्र एक व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून व्यायाम करत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

बाल्कनीत लटकून व्यायाम

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सोसायटीमधील एका उंच इमारतीच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करत आहे. अनेकांना नुसते उंचावरून खाली पाहिले तरी भीती वाटते. मात्र या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कुठेही भीती दिसून येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती 12 व्या मजल्यावरच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करत आहे. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

थरकाप उडवणारा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फरीदाबादचा आहे. हा धक्कादायक व्हिडिओ @viralvdoz नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा 1 मिनिट 4 सेकंदाचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सोबतच काही जणांनी संबंधित व्यक्तीला काळजी घेण्याचा देखील सल्ला दिला आहे. तर अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून व्यायाम करण्याची काय गरज असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.

संबंधित व्हिडीओ

Pushpa सिनेमातली गाणी झाली, रील्स झाले, डायलॉग्सही झाले; आता हे काय नवीनच? पाहा ‘हा’ Viral Video

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत…

…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.