Tribute to Lata Mangeshkar : रांगोळीतून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, 39 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेला ‘हा’ Video
Tribute to Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी 6 यादिवशी निधन झालं. आता एका कलाकाराचा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झालाय. या तरुणीनं रांगोळीच्या (Rangoli) माध्यमातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे फेब्रुवारी 6 यादिवशी निधन झालं. त्यांच्या निधनानं कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांचंच आयुष्य व्यापून गेलंय. त्यामुळे त्या शरीरानं जरी या विश्वास नसल्या तरी गाण्यांच्या रुपानं, मनानं आपल्या सर्वांच्याच सोबत असणार आहेत. त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच दु:ख झालं. प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. आपण सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यातून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला आहे. कुणी गाण्यांच्या रुपानं तर एखादा कलाकार आपल्यातल्या कलेच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना दिसतोय. त्याचे व्हिडिओही मग व्हायरल होत आहेत. आता एका कलाकाराचा व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झालाय. या तरुणीनं रांगोळीच्या (Rangoli) माध्यमातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अप्रतिम कलाकृती
कलाकार शिखा शर्मा यांनी रांगोळीच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केलीय. हाती तंबोरा असलेल्या लता मंगेशकर या रांगोळीच्या माध्यमातून शर्मा यांनी साकारल्या आहेत. तर ही कलाकृती साकारत असताना हा शूट केलेला व्हिडिओ असून बॅकग्राउंडला लता मंगेशकर यांचंच गाणं लावण्यात आलं आहे.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर आर्टिस्ट शिखा शर्मा (Artist Shikha Sharma) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 6 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 39 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर सातत्यानं त्यात वाढत होत आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून त्याला लाइक आणि कमेंट्स करत आहेत. (Video Courtesy – Artist Shikha Sharma)
आणखी वाचा :