नवरा अंघोळ करत नाही, घटस्फोट द्या माय लॉर्ड… महिलेच्या विनंतीने चक्रावलं कोर्ट !
एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने पतीपासून घटस्फोटासाठी दावा दाखल केला. तिचा नवरा क्वचितच आंघोळ करतो, त्यामुळे त्याच्या अंगाला आणि कपड्यांना दुर्गंधी येते. एवढेच नाही तर तो आठवड्यातून एक किंवा दोनदाच दात घासतो, असे सांगत तिने घटस्फोटाची मागणी केली.
Woman demands divorce : आंघोळ करणे आणि स्वतःला स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. उन्हाळ्यात, काही लोक दिवसातून दोन-तीन वेळा आंघोळ करतात, परंतु थंडीच्या दिवसांत अंघओळच करावीशी वाटत नाही. काही असे असतात जे थंडीतही रोज अंघोल करतात, पण बरेच लोक 2-3 दिवस किंवा 4-5 दिवसांनीच अंगावनर पाणी घेतात. पण जरा विचार करा की जर कोणी अंघोळ न केल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर ? हो असं खरंच घडलं आहे. तुर्की येथे येथील एका महिलेने असेच काहीसे केले आहे. तिने अलीकडेच तिच्या पतीविरुद्ध खटला दाखल करत घटस्फोटाची मागणी केली. नवरा क्वचितच आंघोळ करतो, असे सांगत तिने थेट त्याच्याकडून घटस्फोटच मागितला.
अंगाला येतो घामाचा वास
त्या महिलेची ही मागणी ऐकून सगळेच हैराण झाले. पण ती तिच्या मागणीवर ठाम राहिली. त्या महिलेने असाही दावा केला की आंघोळ करत नसल्यामुळे आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासल्यामुळे पतीच्या अंगाला त्याला घामाचा वास येतो. ऑडिटी सेंट्रल या वेबसाइटच्या वृत्तानुसार, महिलेने तुर्की मीडियाला सांगितले की, तिने मुख्यतः वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावाचे कारण देत तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. महिलेच्या वकिलाने अंकारा येथील 19 व्या कौटुंबिक न्यायालयात सांगितले की, तिच्या पतीने किमान 5 दिवस सतत तेच कपडे घातले होते आणि क्वचितच आंघोळ केली होती, ज्यामुळे त्याच्या शरीराला आणि कपड्यांमधून सतत घामाचा वास येत होता.
कोर्टाने दिले भरपाईचे आदेश
रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या पतीविरुद्धच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी काही साक्षीदारांनाही न्यायालयात बोलावण्यात आले होते. ज्यात महिलेच्या पतीचे काही ओळखीचे लोक आणि त्याच्यासोबत काम करणारे काही सहकारी यांचा समावेश होता. या सर्वांनी महिलेच्या पतीच्या खराब वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींची पुष्टी देखील केली. त्यानंतर न्यायालयाने महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट मंजूर केला. तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे माजी पत्नीला नुकसान भरपाई म्हणून 16,500 डॉलर्स ( सुमारे 13 लाख रुपये) देण्याचा आदेशही दिला.
आठवड्यातून 1-2 वेळाच करायचा ब्रश
न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार, असं दिसून आले की महिलेचा पती 7 ते 10 दिवसातून एकदाच आंघोळ करायचा. एवढंच नव्हे तर तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घायायचा. ज्यामुळे श्वासोच्छवासाची दुर्गंधी आणि शरीरालाही घाण वास येत होता. त्यामुळेच त्या महिलेचं जगणं कठीण झालं होतं.