AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : कॉमेडियनही आणि डान्सच्या रियालिटी शोचे विजेतेही, Volodymyr Zelenskyy यांचा ‘हा’ Dance video पाहिला का?

Russia Ukraine war : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची सध्या जगभरात चर्चा होत आहे. झेलेन्स्की एका महिलेसोबत डान्स (Dance) करतानाचा एक जुना व्हिडिओ (Old video)सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.

Viral : कॉमेडियनही आणि डान्सच्या रियालिटी शोचे विजेतेही, Volodymyr Zelenskyy यांचा 'हा' Dance video पाहिला का?
रियालिटी शोमध्ये डान्स करताना Volodymyr Zelenskyys. (Old footage)Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 01, 2022 | 2:04 PM
Share

Russia Ukraine war : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांची सध्या जगभरात चर्चा होत आहे. झेलेन्स्की यांच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. मात्र, या कठीण काळातही रशियाविरुद्ध मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने लढणारे झेलेन्स्की जगभरात लोकप्रिय झाले आहेत. झेलेन्स्की यांच्या व्यक्तिमत्त्वाने लोक इतके प्रभावित झाले आहेत, की सोशल मीडियावर सगळेच त्यांचे कौतुक करत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यादरम्यान झेलेन्स्की एका महिलेसोबत डान्स (Dance) करतानाचा एक जुना व्हिडिओ (Old video)सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 48 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी झेलेन्स्की हे कॉमेडियन होते तसेच डान्सरही. डान्सच्या शोचे विजेतपदही त्यांच्याकडे आहे.

सहकलाकारासह नृत्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा व्हायरल व्हिडिओ 2006चा आहे. जेव्हा त्यांनी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तो युक्रेनच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय होता. वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘डान्सिंग विथ द स्टार्स’ या रिअॅलिटी शोमध्ये केवळ भाग घेतला नाही, तर ते शोचे विजेतेही ठरले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वोलोदिमीर झेलेन्स्की यांना त्यांच्या सहकलाकारासह नाचताना पाहू शकता.

राजकारणात प्रवेश

वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अगदी लहान वयातच अभिनयात पदार्पण केले. नंतर ते युक्रेनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक बनले. 2014मध्ये जेव्हा युक्रेन सरकारने रशियन कलाकारांना देशात काम करण्यास बंदी घातली तेव्हा सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांपैकी वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा समावेश होतो. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राष्ट्रपती बनले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आता वोलोदिमीर झेलेन्स्की यांची जगभरात चर्चा होत आहे.

आणखी वाचा :

विनाशकारी युद्धादरम्यान Viral झाला युक्रेनियन महिलेचा ‘हा’ Video, काय सांगतेय ती? ऐका

यांना तर उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे, युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या उन्मादी वर्तनावर लोक भडकले

Baba Vanga Prediction : सर्व काही वितळून जाईल बर्फासारखे मात्र…; बाबा वेंगांनी केली होती भविष्यवाणी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.