तब्बल 15 किलोमीटरपर्यंत आला स्फोटाचा आवाज, उरात धडकी भरवणारा खार्किवमधला Video viral
Russia Ukraine war : खार्किव (Kharkiv) येथून रशियन (Russian) हल्ल्याचा एक भयानक (Dangerous) व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर उरात धडकी भरेल. रशियाने खार्किवजवळील एअरबेस नष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेनमधील विनाशकारी युद्ध सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनची राजधानी कीवनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खार्किववरही रशियन सैन्याने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. निवासी भागातही बॉम्ब फेकले जात आहेत. दरम्यान, खार्किव (Kharkiv) येथून रशियन (Russian) हल्ल्याचा एक भयानक (Dangerous) व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर उरात धडकी भरेल. रशियाने खार्किवजवळील एअरबेस नष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता, की त्याचा प्रतिध्वनी 15 किलोमीटर दूरपर्यंत लोकांना ऐकू आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सचे म्हणणे आहे, की 21व्या शतकात हे सर्व घडत आहे, हे धक्कादायक आहे. ही 14 सेकंदांची व्हिडिओ क्लिप ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका उंच इमारतीवरून शूट करण्यात आला आहे.
बॉम्बच्या आवाजाचा हादरा
व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकता, की सर्वत्र अंधार आहे आणि बॉम्बच्या आवाजाने मोठा हादरा इथे जाणवला. यादरम्यान, एक जबरदस्त स्फोट होतो. स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण आकाशात त्याचा प्रकाश दिसून आला. हल्ल्यानंतर आगीचे लोट कसे उठतात, ते व्हिडिओत दिसून येईल. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, 15 किमी दूर बसलेल्या लोकांनाही हा हल्ला जाणवला.
ट्विटर हँडलवर शेअर
@itswpceo नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडिओला सतत रिट्विट करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूझर्स म्हणतात, की रशियाने व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला आहे, तर काही लोक या तज्ज्ञांना टॅग करून रशियाने अण्वस्त्रे काढून टाकली आहेत की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय अनेक यूझर्स निरपराध लोकांवर हल्ले केल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दुषणे देत आहेत.
According to #Ukrainian media a Massive explosion reported at an airbase near Kharkiv.
The shockwave could be felt for more than 15 kilometers.
It’s really hard to watch, its happening in 21st century. #UkraineRussia pic.twitter.com/NTSpagsTLs
— Russia Ukraine Updates (@itswpceo) March 1, 2022