विनाशकारी युद्धादरम्यान Viral झाला युक्रेनियन महिलेचा ‘हा’ Video, काय सांगतेय ती? ऐका
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील विनाशकारी युद्ध जोरात सुरू आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर आले आहेत, ज्यात रशियाने युक्रेनमध्ये केलेला विनाश (Collapse) दाखवत आहेत.
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील विनाशकारी युद्ध जोरात सुरू आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) समोर आले आहेत, ज्यात रशियाने युक्रेनमध्ये केलेला विनाश (Collapse) दाखवत आहेत. यावेळी युक्रेनच्या लोकांवर काय वेळ आली, याचा विचार केला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. रशियन सैन्य युक्रेनमध्ये सर्व बाजूंनी घुसखोरी करत आहे, परंतु आता ते सामान्य लोकसंख्येच्या भागांवरही बॉम्बफेक (Bomb) करत आहे. युक्रेनच्या रस्त्यांवर 64 किमी लांबीचा रशियन सैनिकांचा ताफा दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका युक्रेनियन महिलेचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. युक्रेनची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नास्त्य तुमानने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका रणगाड्याच्या आत दिसत आहे.
‘असा सुरू करा रणगाडा’
नास्त्य तुमानने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जर तुम्हाला रस्त्यावर रिकामी लष्करी रणगाडा पडलेला दिसला, तर तुम्ही तो कसा सुरू कराल? तुम्ही हे कसे करू शकाल ते मी तुम्हाला सांगते.” यासोबतच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, भविष्यात त्याचा खूप उपयोग होईल, असेही तिने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये, नास्त्यचा दावा आहे, की तिने रिकाम्या रणगाड्यामध्ये प्रवेश केला आणि नंतर ती स्वतः चालवायला शिकली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ती महिला टाकीच्या आत बसली आहे आणि तो सुरू करण्याबद्दल, गीअर बदलण्याबद्दल आणि नंतर गाडी चालवण्याबद्दल सांगत आहे.
इन्स्टाग्रामवर अपलोड
इन्स्टाग्रामवर एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला सुमारे 35 हजार लोकांनी लाइक केले आहे, तर डझनभर लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नास्त्य तुमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक शेअर करत आहेत. दरम्यान, ज्या रणगाड्यात बसली आहे, तो रशियायाच असल्याचा कोणताही दावा TV9 करत नाही.
उपहासातून केला रेकॉर्ड
व्हिडिओ शेअर केल्यानंतर नास्त्य तुमानवरही टीका झाली. त्यानंतर तिने स्पष्ट केले, की मी युद्धाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ते अपलोड केला नाही, तर तो उपहासात्मक म्हणून रेकॉर्ड केला आहे. गेल्या गुरुवारपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये युक्रेनमधील विनाशाची दृश्य दिसत आहेत.
View this post on Instagram