फोन पळविणाऱ्या ‘या’ मुलीला काय समजावुन सांगतोय हा दुकानदार? Emotional video viral

Kid cute video : लहान मुलांचे व्हिडिओ तर आपण नेहमीच पाहत असतो. यातले काही व्हिडिओ आपल्याला हसवतात. तर काही भावुक (Emotional) करतात. एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालाय. यात दोन लहान मुलं (Child) दाखवली आहेत.

फोन पळविणाऱ्या 'या' मुलीला काय समजावुन सांगतोय हा दुकानदार? Emotional video viral
मोबाइल पळवणाऱ्या चिमुकल्यांना समजावताना दुकानदार
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:30 AM

Kid cute video : लहान मुलांचे व्हिडिओ तर आपण नेहमीच पाहत असतो. यातले काही व्हिडिओ आपल्याला हसवतात. तर काही भावुक (Emotional) करतात. लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात. त्यांच्यातला निरागसपणा, त्यांचे निष्पाप भाव आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात. म्हणूनच की काय सोशल मीडियावर लहान मुलांशी संबंधित अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बहुतांशी व्हिडिओ हे लहान मुलांचे असतात. लहान मुलांचे व्हिडिओ आपल्याला हसवतच नाहीत, तर एखादा संदेशही देतात. म्हणजेच लहानांच्या मोठ्या गोष्टी असंही आपण म्हणू शकतो. एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालाय. यात दोन लहान मुलं (Child) दाखवली आहेत. तर दोन तरूणही आहेत. यांच्यातला भावनिक संवाद आपल्याला भावुक करतो.

अपघातात मरण पावला

व्हिडिओत आपल्याला दिसतंय, की एक मुलगी दुकानात साबण घेण्याच्या कारणानं जाते. दुकानदार तरूण आपला मोबाइल टेबलावर ठेवतो आणि साबण घ्यायला जातो, तर ती मुलगी मोबाइल घेऊन पळून जाते. मग दुकानदार आणि त्याचा सोबती दोघेही मुलीचा पाठलाग करतात. मुलगी आपल्या छोट्या भावासह रस्त्याच्या कडेला जाऊन बसते. त्यांना आपल्या वडिलांना फोन करायचा असतो. दुकानदार तरूण त्यांना वडिलांविषयी विचारतो. त्यावेळी ती चिमुकली त्यांना वडिलांचा फोटो दाखवते. त्यावेळी दुकानदाराचा सोबती तो फोटो ओळखतो आणि त्याला म्हणतो, की हा माणून दोन दिवसांपूर्वी ट्रक अपघातात मरण पावला.

यूट्यूबवर अपलोड

हे समजल्यावर दुकानदार त्या मुलांजवळ जातो आणि त्यांना समजावतो. तो काय म्हणतो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. यूट्यूबवर हा व्हिडिओ अल्टिमेट जावेद (Ultimate Javed) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारीला अपलोड या व्हिडिओला 17 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या भावनिक व्हिडिओला लाइक आणि शेअर करत आहेत. (Video courtesy – Ultimate Javed)

आणखी वाचा : 

शेळीचा smoke करतानाचा Video Viral; लोक म्हणतायत, आधीच्या जन्मी नक्की व्यसनी व्यक्ती असावी!

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत…

Pushpa सिनेमातली गाणी झाली, रील्स झाले, डायलॉग्सही झाले; आता हे काय नवीनच? पाहा ‘हा’ Viral Video

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.