Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!
सर्वात मोठी सायकल
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 10:49 AM

जगातील अनेक लोक त्यांच्या आश्चर्यकारक कामांसाठी ओळखले जातात. काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. या व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केला व्हिडिओ

पोलंडच्या या व्यक्तीने जगातील सर्वात उंच सायकल बनवली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या सायकलची उंची 24 फूट 3.73 इंच म्हणजेच 7.41 मीटर आहे. या माणसाचा पराक्रम इतका जबरदस्त आहे, की ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने स्वत: त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट

या व्हिडिओमध्ये हा माणूस जगातील सर्वात उंच सायकल चालवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे आणि त्याच्या शोधाचे कौतुक केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकणार नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने कॅप्शन लिहिले, ‘Tallest rideable bicycle 24 ft 3.73 in) by Adam Zdanowicz.’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही याबाबत काही अनोखी माहिती दिली. व्हिडिओ पाहा…

उत्तम साहसी राइड

अॅडमच्या मते, ही त्याची आजपर्यंतची सर्वात मोठी सायकल आहे, जी त्याने डिझाइन केली आहे. एक उत्तम साहसी राइड असे त्याचे वर्णन आहे. ते तयार करण्यासाठी त्याला सुमारे एक महिना लागला. त्याच्या सायकलच्या निर्मितीमध्ये त्याने फक्त जुने जीर्ण झालेले साहित्य वापरले. सोशल मीडियावर ही सायकल लोकांना खूप आवडतेय. या व्हिडिओला आतापर्यंत 61 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

Viral Video : निवांत बसले होते गप्पा मारत आणि अचानक कोसळला पंखा

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

Video : पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेला बुर्ज खलिफापेक्षा मोठा लघुग्रह, नासानं शेअर केला GIF व्हिडिओ

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.