dilruba : बांग्लादेशमधील तरुणी भारतातील प्रियकराच्या भेटीला, इथं आल्यानंतर तिच्यासह सगळ्यांना बसला धक्का
Seema haider : सीमा हैदर मागच्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे, ती आपल्या चार मुलांसह प्रियकरासाठी भारतात दाखल झाली आहे. तशीचं आणखी एक तरूणी बांग्लादेशातून प्रियकराच्या भेटीसाठी भारतात दाखल झाली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून भारतात आपल्या प्रियकरासाठी आलेल्या सीमा हैदरची (Seema haider) आजही चर्चा ऐकायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून सीमा हैदरची चर्चा कमी झाली आहे. सोशल मीडियावर ज्यावेळी सीमा हैदर आणि तिच्या प्रियकराने अकाऊंट काढलं होतं. त्यावेळी त्यांना भारतातील अनेक लोकांनी फॉलो देखील केलं होतं. सध्या आणखी एक तसाचं प्रकार उजेडात आला आहे. एक महिला बांग्लादेशातून (bangladesh) भारतात तिच्या प्रियकरासाठी आली आहे. त्या दोघाचं सोशल मीडियावर प्रेम जुळलं आहे. ज्यावेळी बांग्लादेशी महिला त्या तरुणाच्या घरी पोहोचली, त्यावेळी तिथल्या परिसरात अनेकांना धक्का बसला आहे. तिथल्या काही लोकांनी या महिलेची माहिती पोलिसांना (dilruba bangladesh) दिली. त्यावेळी पोलिसांनी त्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे सगळं प्रकरण भारत आणि नेपाळच्या सीमेवरती आहे. हे प्रकरण रोशन गढ येथील आहे. दिलरुबा असं त्या महिलेचं नाव आहे. त्या महिलेची सोशल मीडियावर ओळख झाली होती. तिच्या प्रियकराचं नाव अब्दुल करीम असल्याचं सांगितलं जात आहे. दिलरुबा ज्यावेळी बांग्लादेशातून सीमारेषा ओलांडून भारतात दाखल झाली. त्यावेळी अब्दुलचं हे प्रेम प्रकरण लोकांच्यासमोर आलं. अब्दुलचं पहिलं एक लग्न झालेलं आहे.
इथे झाली सुरुवातीची मुलाखत
दिलरुबाने बांग्लादेशातील राऊझन जिल्ह्यातील चटगाव येथील रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्या महिलेने सांगितले की, ती महिला सुरुवातील अब्दुलला टिकटॉकवरती भेटली होती. तिथून त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. ज्यावेळी ती महिला अब्दुलच्या घरी पोहोचली. त्यावेळी तिला अब्दुलचं पहिलं लग्न झाल्याची माहिती समजली. ज्यावेळी या प्रकरणाची पोलिसांनी सुध्दा चौकशी केली. त्यावेळी त्यांना सुध्दा धक्का बसला आहे.
मागच्या तीन महिन्यापूर्वी सीमा हैदर ही महिला पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात आली. तिची मुलाखत पबजी गेम खेळत असताना उत्तरप्रदेशातील सचिन मीना नावाच्या मुलाशी ओळख झाली होती. सीमा सचिनच्या प्रेमात पागल झाली होती. त्यामुळे तिने भारतात येण्याचं ठरवलं. सध्या सीमा हैदर अजून चर्चेत आहे.