Video | जीव वाचवण्यासाठी आईला तोंडावाटे श्वास, मुलीकडून जीवाच्या आकांताने प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (uttar pradesh daughter giving oxygen by mouth)

Video | जीव वाचवण्यासाठी आईला तोंडावाटे श्वास, मुलीकडून जीवाच्या आकांताने प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
DAUGHTER GIVING OXYGEN TO MOTHER VIDEO
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 11:19 PM

लखनऊ : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे रोज हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. दरम्यान, या लाटेमध्ये हादरवून सोडवणाऱ्या घटना समोर येत आहेत. रुग्णांचे होत असलेले हाल, रुग्णांच्या नातेवाईकांच्या पळापळीचे विचलित करणारे काही व्हिडीओ समोर येत आहेत. सध्या आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशातील आरोग्य व्यस्थेची दुर्दशा समोर आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. (Uttar Pradesh video of daughter giving Oxygen to her mother by mouth goes viral on social media)

आईचा जीव वाचवण्यासाठी तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील बहराईच येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे एक महिला स्ट्रेचरवर पडलेली दिसतेय. तिला व्यवस्थित श्वास घेता येत नसावा त्यामुळे तिची मुलगी आपल्या तोंडावाटे त्या महिलेला श्वास देण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलीचे प्रयत्न पाहून कोणाला भरून आल्याशिवाय राहणार नाही. समोर पडलेल्या महिलेचे प्राण वाचावे यासाठी या मुलीची तडफड डोळ्यांतून पाणी आणणारी आहे.

पाहा व्हिडीओ :

रुग्णालय प्रशासनावर टीका

समोर पडलेल्या महिलेवर बहराईच येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. या महिलेला तोंडावाटे श्वास देणाऱ्या मुलीचा हा व्हिडीओ समोर रुग्णालय प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली.

रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही

दरम्यान, या व्हिडीओबद्दल विचारल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. मात्र, या मुलींनी भावनिक होत आपल्या तोंडावाटे मृत महिलेला श्वास देणं सुरु केलं, असं रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलं. तसेच रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नसल्याचेसुद्धा येथील प्रशासनाने सांगितले.

इतर बातम्या :

Video | कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थिरकणार !

पीपीई कीट घातल्यानंतर काय होतं ? डॉक्टरांना मारहाण करण्यापूर्वी ‘हा’ फोटो पाहाच

Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल

(Uttar Pradesh video of daughter giving Oxygen to her mother by mouth goes viral on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.