Vande Bharat Express मध्ये धो धो पाऊस, काँग्रेसची टीका, नागरिकांनी लावला डोक्याला हात!

Vade Bharat Express संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. ट्विटरवर अनेक युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत की ट्रेनची गुणवत्ता इतकी खराब आहे की ती पावसालाही सहन करू शकली नाही आणि यात रेल्वेचं छत गळताना दिसून येतंय. 8 सेकंदाच्या या क्लिपमध्ये ट्रेनच्या एका डब्यात पाणी पडताना दिसत आहे.

Vande Bharat Express मध्ये धो धो पाऊस, काँग्रेसची टीका, नागरिकांनी लावला डोक्याला हात!
Vande bharat expressImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 1:05 PM

मुंबई: देशातील सर्वात प्रीमियम ट्रेन मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय. ट्विटरवर अनेक युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत की ट्रेनची गुणवत्ता इतकी खराब आहे की ती पावसालाही सहन करू शकली नाही आणि यात रेल्वेचं छत गळताना दिसून येतंय. 8 सेकंदाच्या या क्लिपमध्ये ट्रेनच्या एका डब्यात पाणी पडताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

व्हायरल क्लिपमध्ये ट्रेनच्या एका डब्याच्या छतावरून पावसाचे पाणी गळताना दिसत आहे. याचवेळी यात रेल्वेची कर्मचारी साफसफाई करताना दिसतायत. डब्यात पाणी पसरू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी खाली प्लास्टिकचे काही डबेही ठेवले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिलं आहे की, जर खरंच असं असेल तर मला कमी आरामदायी आणि जुन्या पद्धतीच्या ट्रेनमधून प्रवास करायला आवडेल.

काँग्रेसची सरकारवर टीका

आता या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष ट्विटरवर ही क्लिप जोरदार शेअर करत आहेत. केरळ काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत हा व्हिडिओ वंदे भारत एक्स्प्रेसचा असल्याचा दावा केला आहे.

देशात सध्या 17 वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. 2019 मध्ये वाराणसीहून पहिली हायस्पीड ट्रेन धावली होती. यावर्षी ऑगस्टपर्यंत 75 वंदे भारत चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक राज्य आणि शहर रेल्वेच्या माध्यमातून जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.