Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral

Kirtan video :असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. कीर्तनाचा (Kirtan) हा व्हिडिओ असून श्री क्षेत्र वडगाव लांडगा ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा हा व्हिडिओ आहे. ह. भ. प. वनिताताई पाटील यांचे हे कीर्तन आहे.

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ... मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral
अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन करताना ह. भ. प. वनिताताई पाटीलImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 8:30 AM

Kirtan video : कीर्तनाचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. साधूसंतांचे वचन ऐकल्यानंतर आपला दिवसही चांगला जातो. जीवनासंबंधी चांगला उपदेश या माध्यमातून आपल्याला मिळतो. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. कीर्तनाचा (Kirtan) हा व्हिडिओ असून यूझर्सनी चांगलीच पसंती त्यास दिली आहे. श्री क्षेत्र वडगाव लांडगा ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा हा व्हिडिओ आहे. ह. भ. प. वनिताताई पाटील यांचे हे कीर्तन आहे. पूर्वीच्या काळी महिला जात्यावर जात्यावर धान्य दळायच्या. यावेळी अभंग, ओव्या त्या म्हणायच्या. आधी वासूदेव पहाटे पहाटे यायचा. ईश्वराचे नामस्मरण करायचा. यामुळे आपले आभाळच दुमदुमुन जायचे, असे त्या म्हणाल्या. आता मात्र वासूदेव चित्रात दाखवावा लागतो, असे त्या म्हणाल्या.

ऐकवली मजेशीर कथा

अनेकांना सकाळी सकाळी देवपूजा करायचा कंटाळा येतो. पण देवाचा कंटाळा करू नये. असा संदेश त्यांनी दिला. यासाठी त्यांनी एक कथाही ऐकवली. एका कधीच मुलाची ही कथा आहे. वडील गावी जाताना आपल्या मुलाला देवपूजा करायला सांगतात. पण पुढे काय काय होतं? याची ही मजेशीर कथा आहे. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. पण देव त्याला तारतो. त्यामुळे देवाला टाळू नका, असा संदेश या माध्यमातून कीर्तनकार वनिताताई पाटील यांनी दिला.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हे कीर्तन मराठी तडका (MARATHI TADKA) या चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. ‘गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी!’ असे शीर्षक या व्हिडिओला देण्यात आले आहे. 27 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 45k व्ह्यूज मिळाले असून यात वाढच होत आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरने म्हटले आहे, अति उत्तम कीर्तन. आणखी एका यूझरने म्हटले, की वनिताताई तुमची शालीनता आणि सुसंस्कृतपणा राहणीमान खरोखरच आजच्या मुलींनी अंगीकृत करायला पाहिजे. आजच्या पाश्चिमात्य संस्कृती अंगीकृत करून एवढी सुंदर सभ्य भारतीय संस्कृती पोषाख महिला विसरत चालल्या आहेत. यासह अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. (Video courtesy – MARATHI TADKA)

आणखी वाचा :

कामाविषयी समर्पण हवं ‘असं’; समोर इमारत बॉम्बनं जमीनदोस्त होत होती, ‘तो’ मात्र जागेवरून हलला नाही..!

जब डांस हो जाए आऊट ऑफ कंट्रोल..! ‘हा’ Video पाहून डोळ्यांतून पाणी येईल, पण हसून हसून…

11 मजले, स्विमिंग पूल आणि बरंच काही…; बिकारनेमधलं पक्ष्यांसाठीचं ‘हे’ अपार्टमेंट पाहिलं का?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.