Trending News : बॉयफ्रेंडसाठी मुलीने काढला फॉर्म, 24 तासांत 3 हजार मुलांनी केला अर्ज
एक तरुणी बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. त्यासाठी त्या मुलीने अर्ज काढला आहे. त्या मुलीने तो अर्ज व्हायरल केल्यानंतर 4 तासांत 3 हजार मुलांनी अर्ज भरला आहे. त्या तरुणीची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
मुंबई : आजच्या जमान्यात चांगली नोकरी मिळणे किती मुश्कील झाले आहे. हे तुम्हाला नक्की माहित असेल. तुम्हाला हे सुध्दा माहित असेल की, एका कंपनीत एक किंवा दोन पदांची भरती निघते. त्यासाठी हजारो लोकं अर्ज करतात. तुम्ही कधी बॉयफ्रेंडसाठी अर्ज (form for boyfriend) काढल्याचं ऐकलं आहे का ? हा ही गोष्ट खरी आहे. एका मुलीने तिला बॉयफ्रेंड (boyfriend viral story) हवा असल्यामुळे सोशल मीडियावर तिने अर्ज व्हायरल केला आहे. सध्या ती तरुणी या कारणामुळे अधिक चर्चेत आली आहे. त्या मुलीचा बॉयफ्रेंड (trending story) होण्यासाठी अनेक तरुणांनी अर्ज केला आहे.
त्या मुलीचं नाव वीरा डिज्कमांस (Vera Dijkmans) असं आहे. ती एक मॉडल आहे, त्याचबरोबर ती टीकटॉकवरती व्हायरल सुद्धा आहे. खरतर मुलगा आणि मुलगी यासाठी सध्या डेटिंग अॅपची मदत घेतात. परंतु या मुलीचा अंदाज थोडासा वेगळा आहे. त्या मुलीने एखाद्या सरकारी नोकरी सारखा अर्ज काढला आहे. अनेक मुलांनी तो अर्ज भरला आहे.
24 तासांत 3 हजार मुलांनी केला अर्ज
मेट्रो नावाच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, वीरा डिज्कमांस नावाच्या मुलीने बॉयफ्रेंड जेव्हा अर्ज काढला, तेव्हापासून तरुणांची रांग लागली आहे. त्या तरुणीने सांगितले की, 24 तासांत 3 हजार मुलांनी केला अर्ज केला होता, इतक्या तरुणांनी तिच्याकडे बॉयफ्रेंड होण्यासाठी अर्ज केला आहे. आता प्रश्न असा आहे की, ती कोणत्या तरुणाची निवड करणार आहे. जो तिच्या सगळ्या अटी पुर्ण करेल.
बॉयफ्रेंडकडे या गोष्टी गरजेच्या आहेत
वीरा मागच्या काही दिवसांपासून एकटी असल्यामुळे कंठाळली आहे. ती एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे. तिचं असं मत आहे की, तरुण तिला गर्लेफ्रेंड म्हणून स्विकारण्यासाठी तयार आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांनी ती गर्लेफ्रेंड म्हणून योग्य वाटते, त्यांनी अर्ज करावा असं तिने म्हटलं आहे. ज्या तरुणांना तिला अर्ज करायला आहे. त्यांच्याकडे तिने छोटी माहिती मागितली आहे. त्याचबरोबर काही प्रश्न सुध्दा विचारले आहेत. तो तरुण स्वत:च्या पायावर उभा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या तरुणाला कार्टून सुध्दा नाद असायला हवा.