Video : इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हीचा मृतदेह कसा बाहेर काढला?, 27 वर्षीय तरुणी रिल्स बनविता 300 फूट दरीत कोसळली कशी?

स्थानिक अधिकाऱ्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. एक बचाव पथक घटनास्थळी देखील आले. तटरक्षक दल आणि महाराष्ट्र राज्य वीजमंडळाचे कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त मदत मागितली गेली. परंतू हे सारे प्रयत्न व्यर्थ गेले.

Video : इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हीचा मृतदेह कसा बाहेर काढला?, 27 वर्षीय तरुणी रिल्स बनविता 300 फूट दरीत कोसळली कशी?
anvi kamdar deathImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 1:44 PM

एकीकडे मोबाईलने जग जवळ आले असले तरी रिल्स बनविण्याच्या नादात भलतेच साहस जीवावर बेतू लागले आहे. इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हीचा रायगड जिल्ह्यातील 300 फूट दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर सह्याद्रीच्या गिर्यारोहकांच्या टीमने तिचा मृतदेह कसा बाहेर काढला याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ही दरी पाहून काळजाचा ठोका चुकतो. इतका धोका या अन्वी कामदार हीने पत्करला आहे. अन्वी कामदार हीचे सोशल मिडीयावरील व्हिडीओ काही लाखांनी युजर मिळवित होते. परंतू या युजर मिळविण्याच्या खटपटीत तिचे प्राण गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. इतके धाडस करण्याची काय गरज असा सवाल केला जात आहे.

Anvi kamdar search video here –

अन्वी कामदार कोण होती

इंस्टाग्रामवरील ट्रॅव्हल पोस्टमुळे चर्चेत असलेल्या अन्वी कामदार हिचा मृत्यू चटका लावणारा आहे. मुंबईजवळील रायगड येथे एका 300 फूट दरीत पाय घसरुन ती कोसळली. अन्वीला प्रवासाची प्रचंड आवड होती. या ट्रॅव्हलिंगलाच तिने आपले करिअर बनवले होते. रायगडमधील कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत असताना अन्वीचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. अन्वी कामदार हीच्या इंस्टाग्रामवरील अकाऊंटला दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अन्वी हीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अन्वी कामदार पावसाळ्यातील कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी गेली होती.

अतिउत्साही पावसाळी पर्यटनाचा आणखी एक बळी

अन्वी कामदार एका मोबाईल्स रीलचे शूट करताना 300 फूट खोल दरीत कोसळली.रायगड येथील कुंभे धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. अन्वी 16 जुलै रोजी सात मित्रांसोबत पावसाळी सहलीला आली होती.सकाळी 10.30 वाजता हा अपघात घडला. व्हिडीओ शूटसाठी तिने अतिशय धोका पत्करला आणि अत्यंत निसरड्या वाटेने तरी एका टेकाडाकडे जात होती. त्यावेळी पावसाळ्यातील निसरडा झालेल्या वाटेवरुन तिचा पाय घसरुन ती थेट दरीत कोसळली. अन्वी हीने तिच्या बायोमध्ये स्वत:ला यात्रा जासूस म्हटले आहे. अन्वीला ट्रॅव्हलिंग सोबतच चांगल्या स्थळांची माहिती देण्याचे वेड होते. या वेडानेच अखेर तिचे प्राण गेले…

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....