‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

पोलिसांच्या वर्दीतील एक महिला शिपाई ( Women Constable ) रिव्हॉल्व्हर ( Revolver) घेऊन डायलॉग बोलताना दिसते. या व्हिडीओनंतर चांगलाच वाद तयार झाला. वाद इतका वाढला की, प्रियंका मिश्रा नावाच्या या पोलीस कॉन्स्टेबलला ( Agra Police Viral Video )राजीनामा द्यावा लागला.

'तमंचे पे व्हिडीओ करणं' महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस
agra police viral video
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 6:05 PM

आग्रा: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ ( Viral Video ) सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात पोलिसांच्या वर्दीतील एक महिला शिपाई ( Women Constable ) रिव्हॉल्व्हर ( Revolver) घेऊन डायलॉग बोलताना दिसते. या व्हिडीओनंतर चांगलाच वाद तयार झाला. वाद इतका वाढला की, प्रियंका मिश्रा नावाच्या या पोलीस कॉन्स्टेबलला ( Agra Police Viral Video )राजीनामा द्यावा लागला. मात्र राजीनामा दिल्यानंतरही तिच्या मागच्या अडचणी काही संपल्या नाही. पोलिसांनी प्रियंकाला तब्बल 1 लाख 82 हजार रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. ( video is going viral on the internet showing a woman constable from Agra, flaunting a duty revolver in her uniform)

आओ कभी उत्तर प्रदेश

प्रियंका मिश्रा ही यूपीतल्या औरेया जिल्ह्यात राहणारी आहे. 10 ऑक्टोबर 2020 म्हणजे मागच्याच वर्षी ती यूपी पोलीस विभागात शिपाई पदावर भरती झाली होती. जेव्हा तिची पोस्टिंग आग्र्यात होती, तेव्हा तिने हा व्हिडीओ बनवला होता. व्हिडिओमध्ये स्टाईलमध्ये प्रियंका म्हणते…

‘हरियाणा और पंजाब तो बेकार ही बदनाम हैं. आओ कभी उत्तर प्रदेश, रंगबाजी क्या होती है, हम तुम्हें बताते हैं. न गुंडई पर गाना बनाते हैं, न गाड़ी पर जाट गुज्जर लिखाते हैं…’

प्रियंकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोलिसांच्या वर्दीत केलेले अनेक व्हिडीओ आहे. ज्यात प्रियंका स्टाईलमध्ये असेच काही डायलॉग बोलताना दिसते. आतापर्यंत प्रियंकावर कुठलीही कारवाई झाली नाही, मात्र जेव्हा 24 ऑगस्टला प्रियंकाने रिव्हॉल्व्हर घेऊन व्हिडीओ केला. तेव्हा तो व्हिडीओ तिच्या अंगाशी आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, प्रियंका आणि यूपी पोलिसांवर टीका झाली. वातावरण तापलेलं पाहून प्रियंकाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि 31 ऑगस्टला राजीनामा दिला, तो पोलीस विभागाने मंजूरही केला.

आता भरावे लागणार 1 लाख 82 हजार

राजीनामा दिल्यानंतर आपल्यामागच्या अडचणी संपल्या असं प्रियंकाला वाटलं. मात्र, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांनी प्रियंकाला एक नोटीस जारी केली. मात्र ही नोटीस व्हिडीओ बनवण्यासाठी नाही तर राजीनामा दिला म्हणून देण्यात आली. त्याचं झालं असं, की प्रियंका ही आताच नोकरीला लागली आहे. नियमानुसार 20 वर्षांनंतर कुणाही पोलिसांला स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करता येतो. मात्र, प्रियंकाने तातडीने दिलेला हा राजीनामा या नियमात बसत नाही. त्यामुळे पोलीस विभागाकडून प्रियंकाची ट्रेनिंग, तिची पोस्टिंग आणि तिच्यावर झालेला इतर खर्च याची भरपाई प्रियंकाला करावी लागणार आहे. प्रियंकाने 225 दिवस ट्रेनिंग घेतली, प्रत्येक महिन्याला तिच्या ट्रेनिंगवर 20 हजार 280 रुपये खर्च झाला. म्हणजेच ते होतात 1 लाख 82 हजार रुपये. जे देणं प्रियंकाला बंधनकारक असल्याचं पोलिस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.