Video : जग्वार कारने आधी मोटरसायकलला उडविले, नंतर तीन शाळकरी मुलींना, एक मुलगी 15 फूट दूर उडाली, चालक झाला फरार
हा अपघात 18 जुलै रोजी झाला असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत हा भयानक अपघात चित्रीत झाल्याचे सांगण्यात येते.
कर्नाटक | 27 जुलै 2023 : एका भरधाव जग्वार कारचालकाने एका मोटारसायकलवाल्याला उडविल्यानंतर रस्त्याच्याकडेने जाणाऱ्या तीन शाळकरी मुलींना जोरदार धडक तो पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. ही चित्रफिती पाहता मोटार सायकलवाल्याने चुकीचा युटर्न घेतल्याचा फटका शाळकरी मुलींना बसल्याचे दिसत आहे.
कर्नाटकच्या रायचूर येथे घडलेल्या एका कार अपघाताचा भयानक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मोटरसायकलस्वार रस्त्याच्या मधून रस्ता क्रॉस करीत असताना प्रचंड वेगाने आलेल्या जग्वार कारचालकाने मोटारसायकलस्वाराला ठोकरले. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेने चाललेल्या तीन शाळकरी मुलींना जोरदार धडक देत चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की एक शाळकरी मुलगी 15 ते 20 फूट अंतरावर जाऊन पडली. विशेष म्हणजे इतका भयानक अपघात होऊनही सुदैवाने जीवितहानी न होता तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात 18 जुलै रोजी झाला असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत हा भयानक अपघात चित्रीत झाल्याचे सांगण्यात येते.
हाच तो भयानक अपघाताचा व्हिडीओ –
Wrong U-Turn by Motocyclist Over speeding Car And Cost paid by school going girls?? Incident took place in #Karnataka. I wish for the safety of the girls ??#Accident #RoadAccident #TejRan #HyderabadRains#TelanganaRains #MumbaiRains pic.twitter.com/tbDUBx3Pnp
— Anushka Singh Rawat (@AnuRawat01) July 27, 2023
बाईकस्वाराने यु- टर्न घेतल्याने घडला प्रकार
रायचूर येथील श्रीराम मंदिराजवळ अचानक एका बाईकस्वाराने यु-टर्न घेतल्याने भरधाव जग्वार चालकाने त्याला उडविले. त्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या तीन शाळकरी मुलींना या कार चालकाने उडविले. त्यातील एक मुलगी तर पंधरा फूटांवर जाऊन पडली. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी जग्वार चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेत दोन मुली आणि बाईकस्वाराला जखमा झाला आहेत.
लायसन्स सस्पेंड केले
पोलीसांनी या प्रकरणात बाईक आणि कारला जप्त करण्यात आली आहे. कार ड्रायव्हर आणि बाईकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांचा वाहन चालक परवाना सस्पेंड केला असल्याचे कर्नाटकचे अतिरिक्त महा संचालक ( रस्ते वाहतूक आणि सुरक्षा ) आलोक कुमार यांनी म्हटले आहे.