video | धावत्या मेट्रोत कपलचे लिप-लॉक, व्हायरल झाला व्हिडीओ

धावत्या मेट्रोमध्ये एका कपलचे किसींग सुरु असल्याचा व्हीडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी मेट्रोच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी असल्याचे दिसत आहे.

video | धावत्या मेट्रोत कपलचे लिप-लॉक, व्हायरल झाला व्हिडीओ
metro Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 9:53 PM

नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : मुंबईत मेट्रोचे फारसे जाळे विणलेले नसले तरी मुंबई मेट्रो वनमध्ये मुंगी शिरायला जागा नसते. तिकडे दिल्लीत मेट्रोत मात्र दरवेळी नवनवीन अंतरंगी प्रकार घडत असतात. दिल्ली मेट्रो नेहमी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत असते. दिल्ली मेट्रोत कोणी तंग कपड्यात वापरुन प्रसिद्ध होत असते. तर कोणी अन्य काही भानगडी करुन कायदा मोडत असतात. आता दिल्ली मेट्रोचा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे यात एक प्रेमी युगुल खुल्लमखुल्ला लिपलॉक करताना दिसत आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चेला पेव सुटले आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटर ( आता एक्स ) वर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. @Postman_46 या हॅंडल युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने दावा केला आहे की हा व्हिडीओ आनंद विहार दिल्ली मेट्रो स्टेशन जवळचा आहे. परंतू हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळालेले नाही. या व्हिडीओत एक कपल दरवाज्या जवळ उभे राहून प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहे. विशेष म्हणजे कोचमध्ये अनेक प्रवासी हजर आहेत. परंतू त्यांची चिंता न करता हे कपल प्रेमात गुंग झाले आहे.

हाच तो व्हिडीओ –

हा व्हिडीओ 45 सेंकदाचा असून सोशल मिडीयावर तो व्हायरल होत आहे. अनेक युजर या कपलवर टीका करीत आहेत. एका युजरने म्हटले आहे की आता दिल्ली मेट्रो फॅमिलीसह प्रवास करण्याच्या लायकीची राहीली नाही. दुसरा एक युजरने म्हटले की तरुण पिढीने लाज सोडली आहे. तर तिसरा युजरने म्हटलेय की दिल्ली मेट्रो आता प्रेमीयुगुलांचा अड्डा बनली आहे. यापूर्वीही दिल्ली मेट्रोत असे प्रकार घडले आहेत. याआधी मेट्रोच्या आत असे प्रकार घडले होते. एका प्रवासी तर भरलेल्या मेट्रोत हस्तमैथून करतानाचा व्हिडीओ देखील शेअर झाला होता. त्यानंतर खूपच खळबळ उडाली होती. सीटसाठी प्रवासी भांडण करीत असल्याचे व्हिडीओ तर आता सर्वसामान्य झाले आहेत.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....