भयानक अपघातातून मरता मरता वाचला, उंच उडून जमीनीवर आपटला नंतर उठून उभं राहून करु लागला विचित्र चाळे; Viral video पाहून लोक म्हणाले…
हा व्हिडिओ नेमका कुठला हे अद्याप समजू शकलेले नाही. या व्हिडिओत एका बाईक स्वाराला भरधाव कारने उडवले. कारच्या धडकेत हा तरुण उंच उडून जमीनीवर आपटला. यानंतर तो उभा राहिला आणि चित्र विचित्र हालचाली करु लागला.
देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे. ही म्हण खरी ठरवेल असा थराराक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल(Viral Video) झाला आहे. भयानक अपघातातून( horrific accident) एक तरुण आश्चर्यकारकरित्या बचावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. मात्र, अपघातानंतर तरुणाने जे काही कृत्य केले आहे त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मिडीयावर(Social Media) व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चित्र-विचित्र कमेंट्स येत आहेत. मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर होत आहे.
उंच उडून जमीनीवर आपटला
हा व्हिडिओ नेमका कुठला हे अद्याप समजू शकलेले नाही. या व्हिडिओत एका बाईक स्वाराला भरधाव कारने उडवले. कारच्या धडकेत हा तरुण उंच उडून जमीनीवर आपटला. यानंतर तो उभा राहिला आणि चित्र विचित्र हालचाली करु लागला.
याच्यात आत्मा घुसलाय
एका व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा अपघात इतका भीषण होता की बाईकचे काहा भाग तुटून इतरत्र उडाल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. इतक्या भीषण अपघातातूनही ही व्यक्ती बचावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही येत आहेत. हा चमत्कार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर याच्यात आत्मा घुसलाय अशी कमेंट एका व्यक्तीने केली आहे.
व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheFigen नावाच्या आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 31 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ 1.8 दशलक्ष म्हणजेच 18 लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे.
What is he doing? ?
— Figen (@TheFigen) June 23, 2022