VIDEO: माणसांना लाज वाटावी असं कावळ्याचं शहाणपण, व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल
सध्या कावळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यातील कावळ्याची कृती कोणत्याही माणसाला लाज वाटावी अशी आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे कधी हसायला लावतात, कधी डोळ्यात पाणी आणतात, तर कधी तरी एक मोठा धडा देत आपले डोळे उघडतात. सध्या असाच एक कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यातील कावळ्याची कृती कोणत्याही माणसाला लाज वाटावी अशी आहे. कारण या व्हिडीओत हा कावळा कचरा पेटी असूनही जमिनीवर टाकण्यात आलेला कचरा उचलत आहे. हा कावळा केवळ चोचीने हा कचरा उचलतच नाही, तर तो व्यवस्थितपणे उचलून चोचीने कचरा कुंडीत टाकत आहे (Video showing Crow cleaning wastage surrounding dust bin).
सोशल मीडियावरील या व्हिडीओत कावळ्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या माणसांना चांगलाच आरसा दाखवलाय. या कावळ्याचं हे शहाणपण पाहून लोक त्याला जगातील सर्वात हुशार कावळा म्हणत आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा कावळा अगदी विचारपूर्वक कचरा कुंडीच्या आजूबाजूला उघड्यावर टाकण्यात आलेला कचरा कुंडीत आणून टाकत आहे. म्हणूनच तो जगातील सर्वात हुशार कावळ ठरलाय. जगभरातील लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
This crow knows that humans have lost the sense of shame pic.twitter.com/9ULY7qH4T2
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 1, 2021
अनेकांच्याच नावडीचा विषय ठरलेला कावळा, कौतुकाचा विषय
आपलं घर असो की शहर आपल्याला प्रत्येक ठिकाणी कावळा दिसतोच इतका तो सामान्य पक्षी आहे. त्याचा आवाज हा अनेकांसाठी त्रासाचं कारण बनतो. अनेकदा हाच कावळा आपल्या पक्षांच्या संरक्षणासाठी माणसांवर चोचीने हल्लेही करतो. काहीवेळा झाडाखाली थांबलेले असताना हेच कावळे अनेकांचे कपडेही खराब करतात. त्यामुळे अनेकदा लोक कावळ्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरातून हुसकावून लावण्यावरच भर देतात. मात्र, आता हा कावळा माणसालाही लाजवेल असं स्वच्छतेचं काम करत असल्याने तो सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे.
“कावळ्यालाही माहिती आहे की आता माणसांना लाज वाटायचं बंद झालंय”
अगदी ठरवून आजूबाजूचा कचरा चोचीने उलचून कचरा कुंडीत टाकणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडीओ भारतीय वन प्रशासनातील अधिकारी सुशांता नंदा यांनी शेअर केलाय. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय, “कावळ्यालाही माहिती आहे की आता माणसांना लाज वाटायचं बंद झालंय.” नंदा यांनी आपल्या कॅप्शनमध्ये स्वच्छतेला गांभीर्याने न घेणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या माणसांना चांगलाच टोला लगावलाय. चला तर मग पाहुयात या व्हिडीओतील त्या कावळ्याची शहाणपण सिद्ध करणारी कृती.
चतुर कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहिली जाऊपर्यंतच हा व्हिडीओ 24 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला होता. याशिवाय 3 हजारपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ लाईक केलाय. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करुन आपली भावनाही व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं, “सुसंस्कृत आणि शहाणा कावळा’, तर दुसऱ्याने लिहिलं ‘हा व्हिडीओ पाहून आनंद वाटला’.
हेही वाचा :
VIDEO | झूम… झूम… झूम……झूम; दारुड्याच्या करामती एकदा पाहाच
व्हिडीओ पाहा :
Video showing Crow cleaning wastage surrounding dust bin