Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!
जिराफांची गणना जंगलातील अतिशय शांत प्राण्यांमध्ये केली जात असली, तरी कुणी त्याला त्रास देण्याचा विचार करत असेल तर हा प्राणी चांगलाच धडा शिकवू शकतो.
जंगलाचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत, इथं सिंह जरी राजा असला तरी इतर प्राणी देखील कोणापेक्षा कमी नाहीत. जंगलात काही प्राणी दिसायला खूप शांत वाटत असले तरी त्यांना कोणी चिडवले तर समोरच्याची वाट लावतात. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू फुटेल. (Viral Animal Video of giraffe kick rhinoceros and taught a lesson Funny Moment)
जिराफांची गणना जंगलातील अतिशय शांत प्राण्यांमध्ये केली जात असली, तरी कुणी त्याला त्रास देण्याचा विचार करत असेल तर हा प्राणी चांगलाच धडा शिकवू शकतो. सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, जिथं एका गेंड्याला जिराफ धडा शिकवता दिसत आहे. जिराफाने गेंड्याला अशी काही शिक्षा दिली, की तो आजन्म लक्षात ठेवेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक गेंडा जिराफाजवळ येतो आणि त्याला त्रास देऊ लागतो, जिराफ बराच वेळ त्याची चेष्टा सहन करतो, पण जेव्हा पाणी डोक्यावरुन जातं, तेव्हा तो गेंड्याच्या तोंडावर अशी लाथ मारतो, की गेंडा लगेच पळून जातो.
हा व्हिडीओ पाहा
The kick that the rhinoceros will remember for life… Do you know that a giraffe can kick in any direction?
And can u guess which animal has the strongest kick in the world? No google please. pic.twitter.com/tHjX7WsiQh
— Susanta Nanda (@susantananda3) October 22, 2020
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आजनंतर हा गेंडा कुणालाही त्रास देण्याआधी नक्कीच शंभर वेळा विचार करेल.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जिराफाची लाथ गाढवाच्या लाथेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे.’ अजून एकाने लिहले, ‘गेंड्यांला दिवसा तारे दिसले असतील. याशिवाय अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हा मजेदार व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ‘आता गेंडा जिराफाची लाथ आयुष्यभर लक्षात ठेवेल.’ बातमी लिहिपर्यंत 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा:
Video: अहमदनगरमध्ये मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक, लोक म्हणाले, अशांना चांगलं चोपलं पाहिजे!
Video: पिल्लाचे रक्षण करणाऱ्यांना हत्तीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, हत्ती खूप हुशार असतात!